Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘महसूल भवन’ला वास्तू दोषाने घेरले, दिशांच्या भितीने सरकारी बाबू धास्तावले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

‘महसूल भवन’ला वास्तू दोषाने घेरले, दिशांच्या भितीने सरकारी बाबू धास्तावले

Surajya Digital
Last updated: 2023/06/08 at 12:26 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● वास्तुदोष की कर्मकांड● महसूल भवानात तोकड्या सोयी

सोलापूर : महाराष्ट्राची विचारधारा पुरोगामी विचाराची असताना सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी हे भविष्य, पंचांग, वास्तूदोष यामध्ये गुरफटल्याचे दिसत आहे. ‘Mahsul Bhawan’ surrounded by Vastu Dosh, fear of direction scares government Babu Vastu Dosha Ritual Solapur  त्याची प्रचिती सोलापुरात नव्याने बांधण्यात आलेल्या महसूल भवन अर्थात जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या गोंधळातून आली. कार्यालयांमध्ये कोणत्या दिशेला तोंड करून बसायचे यावरून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे. त्यामुळे महसूल भवनामध्ये वास्तूदोषाची चर्चा रंगली आहे. या चर्चेने नवे जिल्हाधिकारी कार्यालय वादाच्या भोवऱ्यात सापडणार की काय ? अशी शंका निर्माण झाली आहे.

 

अनेक दिवसांपासून रखडलेल्या नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच अखेर लोकार्पण सोहळा दिमाखात पा पडला. जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक कार्यालये या नूतन कार्यालयात स्थलांतरित होत आहेत. बुधवा प्रशासन प्रमुख दस्तुरखुद जिल्हाधिकारी कार्यालयातील दफ्तर एक मोठ्या ट्रकमधून आणले गेले आहे. जिल्हा प्रशासनाचा कारभार नूतन महसूल भवनातूनच चालू आहे. मात्र उद्घाटन झाल्यापासून हे महसूल भवन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. उद्घाटन झाल्यानंतर या महसूल भवनातील दोन महागडे पेंटींग चोरीला गेल्याने खळबळ माजली होती.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

नवीन इमारतीमध्ये जिल्हाधिकारी,
अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी (महसूल) तसेच सामान्य शाखा, (आवक व जावक टपाल), लेखा शाखा, गृह शाखा, जिल्हा खनिकर्म शाखा, ग्रामपंचायत शाखा, पाणी टंचाई शाखा, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, राष्ट्रीय जिल्हा विज्ञान केंद्र, जिल्हा माहिती तंत्रज्ञान शाखा, जिल्हा पुनर्वसन शाखा, कूळ कायदा शाखा, नगर पालिका प्रशासन, आस्थापना शाखा, विधी अधिकारी, महसूल शाखा, नैसर्गिक आपत्ती शाखा, राजशिष्टाचार शाखा विभागाचा कारभार चालू आहे. मात्र, कोणत्या दिशेला तोंड करून बसायचे यावरून कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील काही विभागातील दालनाचे तोंड पश्चिमेकडे आहे. त्यामुळे त्या दालनातील कर्मचाऱ्यांच्या बसण्याची आसन व्यवस्था त्याप्रमाणे केली आहे. मात्र कर्मचाऱ्यांना उत्तर दिशेकडे बसून काम करण्याची इच्छा आहे. कर्मचाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन आसन व्यवस्था कर्मचाऱ्यांच्या मर्जी प्रमाणे करण्याची लगबग सामान्य प्रशासन विभागात बुधवारी दिसून आली. तहसीलदारांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून उत्तर दिशेकडे बसण्याची सोय करण्याची सूचना दिल्याचे सांगण्यात येते.

 

● वास्तुदोष की कर्मकांड

 

कोट्यावधी रूपये खर्च करून निर्माण केलेल्या देखण्या वास्तूमध्ये दोष तर नाही ना? असा मोठा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी जुन्या कर्मकांडमध्ये गुरफटले तर नाहीत ना? याबाबतची चर्चा नूतन महसूल भवनामध्ये जोरदार चालू आहे.

● महसूल भवानात तोकड्या सोयी

महसूल भवनात सर्व विभागांचे कामकाज चालू झाले असले तरी अद्याप सोयी सुविधांचा अभाव आहे. कार्यालयाच्या स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे पहायला मिळते. स्वच्छतागृहात सुद्धा अस्वच्छता आहे. पाण्याची सुविधा नाही. लाईट गेल्यास बसवण्यात आलेली सोलर सिस्टीम कार्यान्वित झाली नाही. त्याचा फटका प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी बसला. अचानक लाईट गेल्याने सर्व खिडक्या उघड्या ठेवून काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली.

 

You Might Also Like

सोलापूर : लक्ष्मण हाके समाजात जातीय विष पेरतात – उमेश पाटील

शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणार – खा प्रणिती शिंदे

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

TAGGED: #MahsulBhawan #surrounded #VastuDosh #fear #direction #scares #government #Babu #VastuDosha #Ritual #Solapur, #कर्मकांड, #वास्तूदोष #कर्मका, #सोलापूर #महसूलभवन #वास्तू #दोष #घेरले #दिशा #भीती #सरकारी #बाबू #धास्तावले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपूरचे भगीरथ भालके केसीआरच्या भेटीला रवाना; शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया
Next Article घरावर दगडफेक : तीन महिलासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी
राजकारण July 14, 2025
मालवणमधील ‘उबाठा’ च्या 4 माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश
महाराष्ट्र July 14, 2025
राज ठाकरेंच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार
देश - विदेश July 14, 2025
विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती – कॅम्पबेल विल्सन
देश - विदेश July 14, 2025
चिनी उपराष्ट्रपतींसोबतच्या भेटीतून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल – एस. जयशंकर
देश - विदेश July 14, 2025
ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन
देश - विदेश July 14, 2025
प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार
देश - विदेश July 14, 2025
लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना
Top News July 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?