मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला जवळपास तीन महिना उलटले आहेत. माञ आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आता सुशांतच्या वडिलांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता रियाच्या विरोधात बरेचसे खुलासे समोर येत आहेत. या दरम्यान सुशांतच्या बॉडीगार्डने एका वाहिनीला मुलाखत देताना धक्कादायक खुलासा केला आहे.
सुशांतच्या बॉडीगार्डने सांगितले की, सुशांतला जाऊन 40 दिवसांनी त्याच्या वडिलांनी रियावर जे आरोप केले आहेत तर त्यात नक्कीच काहीतरी तथ्य असेल. सुशांतच्या आयुष्यात जेव्हा रिया मॅम आल्या तेव्हा सुशांत सरांचे पूर्ण आयुष्य बदलून गेले. इतर वेळी उत्साही असणारे सर सारखे बेडवर पडून रहात होते. काही वेळा तर सुशांत सर त्यांच्या रूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडून असायचे तेव्हा रिया मॅम वरच्या मजल्यावर आपल्या आई, भाऊ आणि काही मित्र यांच्यासोबत पार्टी करायच्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्याने पुढे सांगितले की, 2019 मध्ये सुशांत रियाला भेटला होता. त्यानंतर ते युरोप ट्रीपवर देखील गेले होते. तिथून परतल्यानंतर सुशांत सारखा आजारी पडत होता. त्याआधी सुशांत खूप सक्रीय होता. जिम, स्विमिंग, डान्स हे सर्व तो करायचा. मात्र त्यानंतर तो बेडवरच राहू लागला होता.
सुशांतची औषध आणयला मी जेव्हा जायचो तेव्हा मला मेडिकलवाले मला विचारायचे हे औषध कोणासाठी आणि कोणी मागवली आहे. तेव्हा मनात यायचे की औषधांमुळे सर पडून रहात असावेत. रिया मॅमने सुशांतचा सर्व जुना स्टाफ बदलला होता. फक्त मीच शिल्लक राहिलो होतो जो त्यांच्याजवळ असायचो, असे एकना अनेक खुलासे केले आहेत.