Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सुशांतसिंग राजपूत प्रकरण : सीबीआय क्लोजर रिपोर्टवर रिया चक्रवर्तीला न्यायालयाची नोटीस
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सुशांतसिंग राजपूत प्रकरण : सीबीआय क्लोजर रिपोर्टवर रिया चक्रवर्तीला न्यायालयाची नोटीस

admin
Last updated: 2025/07/30 at 5:19 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 30 जुलै – अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टच्या पार्श्वभूमीवर रिया चक्रवर्तीला मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने नोटीस बजावली आहे. कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून ही नोटीस पाठवण्यात आली असून, रियाला या अहवालावर आपली भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली आहे.

Contents
प्रकरणाची पार्श्वभूमीप्रकरण पुन्हा चर्चेत

सीबीआयने मार्च 2025 मध्ये आपला तपास अहवाल न्यायालयात सादर केला होता. मुख्य महानगर दंडाधिकारी आर.डी. चव्हाण यांनी रियाला 12 ऑगस्टपर्यंत यावर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रकरणाची पार्श्वभूमी

सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीने त्याच्या दोन बहिणी – प्रियांका सिंग आणि मितू सिंग, तसेच डॉ. तरुण नथुराम यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तिच्या आरोपानुसार, या तिघांनी वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय सुशांतला औषधे दिली होती. या प्रकरणात आयपीसी आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रियाच्या मते, सुशांतला ‘बायपोलार डिसऑर्डर’ असल्याचे निदान झाले होते आणि तो नियमित उपचार घेत नव्हता. अशा स्थितीत बहिणींनी त्याला मेसेजद्वारे औषधे सुचवली होती. या औषधांसाठी वापरण्यात आलेले प्रिस्क्रिप्शन बनावट असल्याचा आरोप तिने केला होता.

प्रकरण पुन्हा चर्चेत

सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत झाला होता. मृत्यूची चौकशी सुरु असून, गेली पाच वर्षे हे प्रकरण विविध स्तरांवर चर्चेत राहिले आहे. आता सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट आणि त्यावर रियाचा संभाव्य आक्षेप यामुळे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिवराज्याभिषेक दिन हा देशातील सर्वात मोठा उत्सव असावा – संभाजी भिडे
Next Article निवडणुकीसाठी मुदतवाढ मागणार : सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात अर्ज

Latest News

Почему переживание «почти получилось» мотивирует не сдаваться
Top News December 8, 2025
test
Top News December 7, 2025
test
Top News December 7, 2025
Roulette Real Money India with Jackpots
Top News December 7, 2025
Play Live Roulette UK for Beginners: A Comprehensive Guide
Top News December 7, 2025
Каким образом личные мотивы формируют действия
Top News December 7, 2025
Gentle Monster Eyewear Designer Glasses With KUN 2025 Moncler+Gentle Monster
Top News December 7, 2025
Vale Fresh Pieces Zip Up Hoodies
Top News December 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?