सोलापूर, 1 ऑगस्ट। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल 17 वर्षांनंतर विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. या निकालानंतर माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राम सातपुते यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करत म्हटले की,
“हिंदूंना आतंकवादी म्हणणारे सुशीलकुमार शिंदे यांनी आता सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी.”
📌 पार्श्वभूमी :
-
जानेवारी 2013 मध्ये जयपूर येथील काँग्रेस अधिवेशनात सुशीलकुमार शिंदे यांनी “भगवा दहशतवाद” या शब्दप्रयोगाचा उल्लेख केला होता.
-
त्यानंतर देशभरात यावरून मोठा वाद निर्माण झाला.
-
पुढे शिंदे यांनीच मान्य केले की, “मी पक्षाच्या सांगण्यावरून तो शब्द वापरला. हा शब्द चुकीचा होता, तसे बोलायला नको होते.”
राम सातपुते यांच्या वक्तव्यामुळे मालेगाव निकालानंतरचा राजकीय वाद आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.