Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सुशीलकुमार शिंदेंच्या घरासमोर उपोषण करण्याचा सपाटेंचा इशारा, बिपिनभाई म्हणतात ‘त्या’ जागेवर आमचाच दावा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सुशीलकुमार शिंदेंच्या घरासमोर उपोषण करण्याचा सपाटेंचा इशारा, बिपिनभाई म्हणतात ‘त्या’ जागेवर आमचाच दावा

Surajya Digital
Last updated: 2022/03/12 at 10:43 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

सोलापूर : कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथील शंभर एकर जागा खासदार शरद पवार यांच्या नावे शेतकी महाविद्यालयासाठी तसेच आयटी पार्कसाठी साठेखत करून घेतले होते.  मात्र या जागेवर मेहुल कन्स्ट्रक्शनचे बिपिनभाई पटेल यांनी आता ताबा घेतला आहे, असा आरोप माजी महापौर मनोहर सपाटे यांनी आज शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

मनोहर सपाटे म्हणाले , महार सोसायटीसाठी आरक्षित असलेली जागा त्या सोसायटीअडून आपण साठेखत करून व्यवहार केला होता , बिपिनभाईंनी त्यांच्याकडून परस्पर  ही जागा खरेदी केली आहे.  आता याचे वहिवाटदार किंवा मालक आपणच आहोत असे सांगत  त्यांनी याठिकाणी अनाधिकारानं प्रवेश मिळवून ताबा घेतला आहे. बिपिनभाई पटेल यांच्या या कृत्याच्या पाठीमागे सुशीलकुमार शिंदे यांचा आशीर्वाद आहे. त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे कृत्य होऊ शकत नाही, असा आरोपही सपाटे यांनी केला. Bipinbhai says Sapate’s warning to fast in front of Sushilkumar Shinde’s house is our claim on ‘that’ place

या विरोधात आपण फौजदारी गुन्हा दाखल केलाय. न्यायालयातही गेलो आहोत पण जनतेच्या न्यायालयात ही बाब जावी, यासाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानासमोर लवकरच उपोषण करणार आहोत असेही ते म्हणाले. यावेळी मनोहर सपाटे यांचे अनेक समर्थक उपस्थित होते.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

■ मनोहर सपाटे यांनी केलेल्या आरोपांबद्दल बिपिनभाई पटेल यांचे प्रत्युत्तर

बिपिनभाई पटेल यांनी मनोहर सपाटे  यांचे सर्व आरोप चुकीच्या माहितीच्या आधारावर आहेत, त्यांनी साठेखत केले होते पण मुदतीत पुढील व्यवहाराची कोणतीच कार्यवाही केले नाही. आम्ही रीतसर सर्व कागदोपत्री कायदेशीर कार्यवाही करून  जागा खरेदी केली आहे. यामुळे सपाटे यांचा त्या जागेवर कोणताच अधिकार नाही. मनोहर सपाटे यांना या साठेखत बाबतचे पैसे वकीलाच्या सल्ल्याने आम्ही खरेदीपूर्वी दिलेल्या चेकची रक्कम रजिस्टर  पोस्टाने पाठविले होते पण ते त्यांनी स्वीकारले  नाहीत.

आम्ही आमच्या जागेत कंपाऊंड मारले आहे, तिथे सपाटे यांचेच समर्थक येऊन घुसखोरी करतात. विडीओ चित्रकारणातील माणसं त्यांचीच आहेत  असे बिपिनभाई पटेल म्हणाले, या व्यवहारात सुशीलकुमार शिंदे  किंवा अन्य  कोणाचाही सहभाग, सहमती, पाठिंबा नाही. त्यांच्या घरासमोर उपोषणास बसण्यामागे अन्य काही हेतू असावा, असे बिपिनभाई पटेल यांनी सांगितले आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Bipinbhai #Sapate's #warning #front #SushilkumarShinde's #house #claim #place, #सुशीलकुमारशिंदे #घरासमोर #उपोषण #सपाटे #इशारा #बिपिनभाई #जागेवर #दावा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर : पैशावरून आचार्‍याने केले हॉटेलमालकाच्या ११ वर्षाच्या मुलाचे अपहरण
Next Article राज्यभरात भाजपचे आंदोलन : देवेंद्र फडणवीसांना बजावलेल्या नोटिसची सोलापुरात दहन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?