Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांचे निलंबन मागे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांचे निलंबन मागे

Surajya Digital
Last updated: 2021/12/02 at 9:42 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : विजापूर रोडवरील नागेश ऑर्केस्ट्रा बार छापा प्रकरणात निलंबित असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांचे निलंबन मागे घेण्यात आले असून तसा आदेश पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी दिला आहे.

निर्बंध असतानाही नागेश बार सुरू राहिला कसा आणि त्याची माहिती तुम्हाला का नव्हती, असा ठपका ठेवत पोलिस आयुक्‍त हरीश बैजल यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यावर ठोस कारवाई करत त्यांना थेट निलंबितच केले होते. त्यानंतर काही दिवसात दिवसातच डीबी पथक प्रमुख शीतलकुमार कोल्हाळ यांनाही निलंबित केले होते.

बुधवारी सायंकाळी आयुक्त  यांनी पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांचे निलंबन मागे घेतले, याबाबत या बातमीला पाटील यांनी दुजोरा दिला आहे. मात्र अद्याप आपल्याला आदेश आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणात आपल्याला निलंबित करण्याची गरजही नव्हती. निलंबन रद्द होणार होतेच. आता त्याची मला माहिती मिळाली आहे. मात्र आदेश अजून मिळाला नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* मुळेगाव तांडा येथील जुगार अड्ड्यावर धाड; २२ जणांवर गुन्हा १२ जणांना अटक

सालापूर – मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर) येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून २२ जुगा-याविरुद्ध गुन्हा दाखल करून १२ जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून १ लाख १७ हजार रुपये रोख आणि इतर साहित्य असा एकूण ६ लाख ४५ हजाराचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई काल बुधवारी करण्यात आली.

मुळेगाव तांडा येथील दर्गाच्या पाठीमागे असलेल्या पत्राशेडमध्ये जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली. त्याप्रमाणे त्यांच्या पथकाने काल धाड टाकून सत्यजित पवार (रा. मुळेगाव तांडा) प्रेम बडेकर (रा.भवानी पेठ) जावेद विजापूरे (रा.शास्त्रीनगर) शिवशंकर मस्के (रा. सिद्धार्थनगर) सादिक बागवान (रा. शास्त्रीनगर) व्यंकटेश लेकरुवाळे रा.डफरीन चौक) हनुमंत पवार रा.साई बाबा चौक) स्वप्नील खैरमोडे (रा.शुक्रवार पेठ) जमीर बागवान (रा.लक्ष्मी मार्केट) आमिर उर्फ मुर्तूज शेख (रा.रविवार पेठ) पद्माकर कांबळे रा. दोड्डी) आणि संतोष राठोड (रा.मुळेगाव तांडा) अशा १२ जणांना अटक केली. तर इतर आरोपी पोलिसांची चाहूल लागताच पसार झाले.

त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी १लाख १७ हजाराची रोकड, ११ मोटारसायकली, ५ मोबाइल आणि जुगाराचे साहित्य असा  माल जप्त केला. त्यांच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी सहाय्यक निरीक्षक रवींद्र मांजरे, सहाय्यक फौजदार खाजा मुजावर, नारायण गोलेकर, मोहन मन्सावाले, अक्षय दळवी आणि समीर शेख यांनी केली.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Suspension #policeinspector #UdaySinghPatil #Raid #gambling, #वरिष्ठ #पोलीसनिरीक्षक #उदयसिंहपाटील #निलंबन #मागे #जुगार #छापा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आम्ही महिला पंतप्रधानांसाठी तयार आहोत – ऋचा चढ्ढा
Next Article भारतात ओमिक्रॉन रुग्णाच्या संपर्कात आलेले 5 जण पॉझिटिव्ह

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?