Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पत्नीवर संशय घेऊन पतीने डोक्यात घातला दगड
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पत्नीवर संशय घेऊन पतीने डोक्यात घातला दगड

Surajya Digital
Last updated: 2022/04/05 at 8:52 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : पत्नीवर संशय घेतल्याप्रकरणी पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून जखमी केल्याची घटना सोमवारी (दि.४) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वारोनको प्राथमिक शाळा रेल्वे लाइन्स सोलापूर येथे घडली.

याप्रकरणी रोजमेरी ब्रिजेश चव्हाण (वय- ३२,रा. वारोनको प्राथमिक शाळा, रेल्वे लाइन्स,सोलापूर) यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून पती ब्रिजेश रजनीकांत चव्हाण (रा. हिंदुस्तान शाळेच्या पाठीमागे, रंगभवन, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा पती ब्रिजेश याने त्यांची पत्नी रोजमेरी यांच्यावर संशय घेऊन शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर तेथेच पडलेला दगड घेऊन फिर्यादी यांच्या डोक्यात मारून जखमी केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल खान हे करीत आहेत.

● बस कंडक्टरची रक्कम अज्ञात चोरट्याने पळवली

सोलापूर : कोणीतरी अज्ञात इसमांनी बस कंडक्टर यांच ११ हजार १५० रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना मंगळवारी ( दि.५) संत तुकाराम चौक सोलापूर बस डेपो नंबर २ सोलापूर येथे घडली. याप्रकरणी परशुराम मल्लप्पा बजेंत्री (वय-३९,रा. गदक राज्य – कर्नाटक) यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यांच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Suspicious of his wife, the husband threw a stone at her head

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे के.ए.२६.एफ ९८६ सीबस घेऊन सोलापूर येथे आले. त्यावेळी त्यांनी सोलापूर बस डेपो येथे सर्व प्रवासी यांना उतरून संत तुकाराम चौक सोलापूर बस डेपो नंबर २ येथे मुक्कामी पोचले व नेहमीप्रमाणे जेवण करून दहा वाजण्याच्या सुमारास झोपी गेले.दरम्यान त्यांच्या खिशातील वरील रक्कम कोणीतरी अनोळखी इसमांनी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नदाफ हे करीत आहेत.

□ तिर्‍हे येथे अनोळखी वाहनाच्या धडकेने पादचारी ठार

सोलापूर – बसवेश्वर नगर ते तिर्‍हे (ता. उत्तर सोलापूर) या रस्त्यावर अनोळखी वाहनाच्या धडकेने शंकर चावला पवार (वय ५३ रा. बसवेश्वरनगर, देगाव) हे गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मरण पावले. हा अपघात काल सोमवारी रात्री च्या सुमारास घडला.

शंकर पवार हे काल रात्री तिर्‍हे येथील नाईक यांच्या शेतात काम करून पायी घराकडे निघाले होते. वाटेत पाठीमागून अनोळखी वाहन लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना संतोष पवार (मुलगा) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते पहाटे मरण पावले. या अपघाताची नोंद सलगरवस्ती पोलिस आज झाली आहे .

□ नशेत विष पिऊन आत्महत्या

वाशिंबे (ता.करमाळा) येथे राहणाऱ्या गंगाराम संजय  सूनमारे (वय ४५) याने दारूच्या नशेत विष पिऊन आत्महत्या केली. काल सोमवारी रात्रीच्या सुमारास त्याने वाशिंबे येथील राहत्या घरात नशेत विष प्राशन केले होते. समाधान (मुलगा) यांनी त्याला करमाळा येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान तो मंगळवारी सकाळी मरण पावला, अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे .

 

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Suspicious #wife #husband #threw #stone #head, #पत्नी #संशय #पती #डोक्यात #दगड #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्र हादरले ! नांदेडमध्ये गोळीबार, बिल्डरचा मृत्यू
Next Article शिवतीर्थावर आनंद : राज ठाकरे बनले आजोबा, अमित झाले बाबा

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?