Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: #HappybirthdaySachin सचिन ! क्रिकेटविश्वाला पडलेलं गोड स्वप्न, विश्वविक्रमी 100 शतकांची नोंद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

#HappybirthdaySachin सचिन ! क्रिकेटविश्वाला पडलेलं गोड स्वप्न, विश्वविक्रमी 100 शतकांची नोंद

Surajya Digital
Last updated: 2021/04/24 at 4:34 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : तमाम क्रिकेट चाहत्यांसाठी आज खास दिवस आहे. ज्याला क्रिकेटचा देव असे म्हणण्यात आले, अशा सचिनचा आज वाढदिवस आहे. तो मैदानात उतरला की सचिन… सचिन… सचिन अशा घोषणांनी मैदान दणाणून जात होतं. तो आऊट झाला की अख्खं मैदान शांत होत असे. 22 वर्षे क्रिकेटची खेळपट्टी गाजवणाऱ्या सचिनने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली अन् खूप आनंददायी क्षण दिले. क्लासिक फलंदाजीचा बादशाह सचिनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

एन. व्ही. रमण्णा यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ
https://t.co/LgQ5Jfaqzl

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021

“क्रिकेटचा देव”, “मास्टर-ब्लास्टर” अशा अनेक नावाने प्रसिद्ध असलेला भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आज आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सचिनने आपली निवृत्ती जाहीर केली आणि तो  तो क्षण प्रत्येक क्रिकेट प्रेमीसाठी आजवरचा भावनिक क्षण ठरला.

Many many happy returns of the day @sachin_rt to an absolute legend of cricket. Your passion towards cricket made us love the game and gave a lifetime of memories! Wishing you a blessed & a healthy life always 🙌 pic.twitter.com/llPGhtu4rd

— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) April 24, 2021

क्रिकेटच्या दुनियेतील अनेक विक्रम सचिनने आपल्या नावावर केले आहे पण एक असा रेकॉर्ड आहे जो मास्टर-ब्लास्टर आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या अखेरपर्यंत करू शकला नाही आणि तो म्हणजे क्रिकेटची पांढरी म्हटल्या जाणाऱ्या ‘लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड’वर कसोटी शतक आहे. लॉर्ड्स येथे कसोटी शतक झळकावणे प्रत्येक खेळाडूसाठी नेहमीच खास ठरले आहे. पण प्रत्येक खेळाडूला लॉर्डस् ऑनर्स बोर्डवर आपले नाव लिहून हा सन्मान मिळवता आलेला नाही आणि सचिन देखील याच खेळाडूंमध्ये सामील आहे.

Wishing you a happy birthday @sachin_rt paaji 🤗 Please do take care of your health. pic.twitter.com/I2YLNvXC3u

— Shikhar Dhawan (@SDhawan25) April 24, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सचिनने कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय स्तरावर 51 कसोटी शतके ठोकली होती पण क्रिकेटच्या मक्का येथे त्याला एकही शंभरी पार करता आलेली नाही. 1989 मध्ये पदार्पणानंतर सचिन संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत 9 वेळा लंडनच्या या प्रसिद्ध मैदानावर उतरला आहे. सचिनने या मैदानावर 21.67 च्या सरासरीने 10, 27, 31, 16, 12, 37, 16, 34, 12 – एकूण 195 धावा केल्या आहेत जे तेंडुलकरच्या प्रतिष्ठेला योग्य न्याय देत नाही. मात्र, एक अशी गोष्ट आहे.

One of the greatest to have ever played the game and an inspiration to many. Happy Birthday @sachin_rt paaji.

— Virat Kohli (@imVkohli) April 24, 2021

अनेक चाहत्यांना माहित नसेल आणि ती म्हणजे लॉर्ड्समध्ये सचिनने शतक झळकावले आहे, जी त्याची संस्मरणीय खेळी ठरू शकते. 1998 मध्ये Marylebone क्रिकेट क्लब संघाविरुद्ध उर्वरित वर्ल्ड इलेव्हनकडून खेळताना सचिनने लॉर्ड्सवर 114 चेंडूत 125 धावांची धमाकेदार शतकी खेळी केली होती. इंग्लंडच्या प्रिन्सेस डायनाच्या आठवणीत या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. तेंडुलकरच्या संघाने डाव आणि 125 धावांनी सामना जिंकला होता.

खुशखबर ! भारतात कोरोनावरील औषधाला मान्यता https://t.co/SEG46wsKeT

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021

* विश्वविक्रमी 100 शतकांची नोंद

भारताकडून लॉर्ड्सच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी शतके करण्याचा विक्रम माजी दिग्गज फलंदाज दिलीप वेंगसरकर यांच्या नावावर आहे ज्यांनी सर्वाधिक 3 टेस्ट शतक झळकावले आहे. दुसरीकडे, सचिनने आपल्या 24 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांची नोंद केली आहे. शिवाय, मास्टर-ब्लास्टर सर्वाधिक 200 कसोटी सामने खेळणारा एकमेव खेळाडू देखील आहे. सचिनने कसोटीमध्ये 51 तर वनडेमध्ये 49 शतकांची अशा एकूण विश्वविक्रमी 100 शतकांची नोंद केली आहे.

https://twitter.com/Sachin_Trends/status/1385631802933514244?s=19

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

TAGGED: #Happybirthday #Sachin #सचिन #क्रिकेटविश्वाला #पडलेलं #गोडस्वप्न #विश्वविक्रमी #100 #शतकांची #नोंद, #sweetdream #cricketing #world #worldrecord #100centuries
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एन. व्ही. रमण्णा यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ
Next Article हायवेच्या कडेला पीपीई किटमध्ये आढळला कुजलेला मृतदेह

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?