Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: 2021 चा टी-20 वर्ल्डकप भारतातच होणार; भारतास यजमानपदाची दुसरी वेळ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळदेश - विदेश

2021 चा टी-20 वर्ल्डकप भारतातच होणार; भारतास यजमानपदाची दुसरी वेळ

Surajya Digital
Last updated: 2020/11/13 at 8:57 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : वर्ल्ड कप टी-20 2021 या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारताला मिळाला आहे. यावर आयसीसीनेे शिक्कामोर्तब केला आहे. भारताला यासारख्या मोठ्या स्पर्धेच्या यजमानपदाची संधी मिळाली आहे. ही भारतासाठी सन्मानजनक बाब असल्याचं, बीसीसीआयचा अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली म्हणाला आहे.

नियोजित वेळापत्रकानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021 दरम्यान ही स्पर्धा खेळण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. याबाबतची माहिती आयसीसीने दिली. तसेच गांगुलीने आपल्या ट्विटरवरुन या ट्रॉफीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

“टी 20 वर्ल्ड कप या सारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारताला मिळाला. या स्पर्धेचं यजमानपद मिळणं हे आमच्यासाठी सन्मानजनक आहे. भारताला 1987 मध्ये 50 षटकांच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनपदाचा मान मिळाला होता. तेव्हापासून भारताने यशस्वीरित्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन केलं आहे. जगभर क्रिकेट खेळणारे आपले क्रिकेटपटू भारतात ही स्पर्धा खेळण्यासाठी उत्साही आहेत”, असंही गांगुली म्हणाला. आयसीसीने एक परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये गांगुलीने हे वक्तव्य केलं आहे.

“मी एक खेळाडू म्हणून आयसीसीच्या स्पर्धेचा एक भाग राहिलो आहे. तसेच मी याचा आनंदही घेतला आहे. या स्पर्धेचं आनंद घेणाऱ्या क्रिकेट रसिकांसाठी उत्तम वातावरणापेक्षा आणखी काहीच मोठं नाही. मी आता एक प्रशासकाच्या भूमिकेत आहे. मी प्रशासक म्हणून भूमिका बजावण्यासाठी उत्सूक आहे कारण मी एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं यजमानपजद पार पाडण्यासाठी सज्ज आहे”, असंही गांगुलीने नमूद केलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यावर्षी म्हणजेच 2020 मध्ये या वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्व जगात कोरोनाने थैमान घातलं होतं. यामुळे या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. 2021 मध्ये भारतात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे 2022 सालच्या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान ऑस्ट्रेलियाला देण्यात आला आहे.

भारताला टी 20 स्पर्धेंच यजमानपदाचा मान मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी भारताला 2016 मध्ये हा मान मिळाला होता. या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात वेस्टइंडिने इंग्लंडवर मात केली होती.
या वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अशा एकूण 16 संघ या स्पर्धेत खेळणार आहेत.

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत ही स्पर्धा जिंकली होती.

“या वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनासाठी आम्ही सज्ज आहोत. ही स्पर्धा सुरक्षितरित्या होण्यासाठी तसेच सर्वांसाठी संस्मरणीय ठरेल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत”

जय शाह – सचिव, बीसीसीआय

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #2021चा #टी-20वर्ल्डकप #भारतातचहोणार #यजमानपदाची #दुसरीवेळ #जयशहा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ईडी काय तुमच्या बापाची? शेठजींच्या पक्षातील प्रवक्ते फडफड करतायत
Next Article अभिमानस्पद ! जलसंपत्ती नियमनात महाराष्ट्र देशात अग्रेसर; नदी पुररूज्जीवनात ‘सांगली’ देशात पहिला

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?