Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: टी-20 – भारताचा 5 गडी राखून विजय, भुवनेश्वर चौथ्या क्रमांकावर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

टी-20 – भारताचा 5 गडी राखून विजय, भुवनेश्वर चौथ्या क्रमांकावर

Surajya Digital
Last updated: 2021/11/17 at 11:28 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

जयपूर : भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज पहिला T-20 सामना खेळला गेला. यात भारताने ५ गडी राखून विजय मिळवला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर न्यूझीलंडने ५ गडी बाद १६५ धावांचे भारतासमोर आव्हान ठेवले. याच्या प्रत्त्युत्तरादाखल खेळतांना भारताने ३ गडी बाद १६४ धावा केल्या.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आज बुधवारी टी२० मालिकेतील पहिला सामना रंगला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावत १६४ धावा केल्या.

सामन्यात भारताने सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघासाठी गोलंदाजीवेळी पहिले षटक टाकण्यासाठी भूवनेश्वर कुमार आला. त्याने त्याच्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलने एक धाव घेतली आणि स्ट्राइकवर डार्ली मिशेल आला.

यानंतर भुवनेश्वरने षटकाचा तिसरा चेंडू टाकला आणि मिशेल सामन्यातील पहिल्याच चेंडूचा सामना करताना विकेट गमावून बसला. आणि तीही अशी तशी नाही तर, भूवीच्या जबरदस्त स्विंगवर तो त्रिफळाचीत झाला. याचबरोबर भवनेश्वरने पहिल्या षटकात मिशेलची विकेट घेताच, आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५० विकेट्सही पूर्ण केल्या.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत भुवनेश्वर सध्या चौथ्या क्रमांकावर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी एक पाऊल पुढे आला आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सध्या रविचंद्रन अश्विन आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५८ विकेट्स घेतल्या आहेत.

तर, भारताकडून सर्वाधिक टी-२० विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ६६ विकेट्स घेत जसप्रीत बुमराह विराजमान आहे. दुसऱ्या क्रमांकावर ६३ विकेट्स घेऊन युजवेंद्र चहल आहे. या यादीत पाचव्या क्रमांकावर ४६ विकेट्ससह रवींद्र जडेजा आहे.

दरम्यान, न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात सलामीवीर मिशेल शुन्यावर बाद झाल्यानंतर मार्टिन गप्टील आणि चैंपमेन यांनी चांगली फलंदाजी करत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने भारताला १६५ धावसंख्येचा आव्हान होते.

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

TAGGED: #T20 #India #win #by5wickets #Bhubaneswar #No4, #टी-20 #भारत #5गडी #विजय #भुवनेश्वर #चौथ्या #क्रमांकावर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अनिल देशमुखांच्या त्रासाचा एक- एक मिनिट वसूल करू; बदला घेण्याचा इशारा
Next Article शेतात उगवली ‘कोरोना’ सदृश्य काकडी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?