नाशिक, 5 जून (हिं.स.) : केंद्र आणि राज्य सरकारने अनेक विकास कामे केलेली आहे ती विकास कामे नागरिकांपर्यंत पोहोचवा त्यांना त्याचा लाभ कसा मिळेल या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. गुरुवारी नाशिक मध्ये भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासाठी नाशिक मध्ये आले होते यावेळी त्यांच्या समावेत पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे मंत्री गिरीश महाजन, विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार रावल, आधी उपस्थित होते.
यावेळी उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत नाशिकचे महानगर अध्यक्ष सुनील केदार जिल्हाध्यक्ष यतीन कदम, सुनील बच्छाव, लक्ष्मण सावजी, पवन भगूरकर, प्रशांत जाधव, नाना शिलेदार, कैलास अहिरे, अलका अहिरे, यांनी केले . यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पक्षामध्ये कोणी यावे कोणी जावे याबाबत जास्त काही बोलणार नाही परंतु जे पक्षाच्या विचारधारेला धरून पक्षांमध्ये येतील त्यांचे पक्षांमध्ये स्वागत केले जाईल त्यांना पक्षांमध्ये प्रवेश दिला जाईल त्यांना पक्षातून कितीही विरोध असला तरीही त्या संदर्भामध्ये विरोधी लोकांशी चर्चा करून प्रवेशाचा मार्ग हा घेतला जाईल. असे स्पष्ट करून ते म्हणाले की इथून पुढे दर मंगळवारी मी आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण पक्षाच्या प्रदेश कार्यालयात असणार आहे त्या ठिकाणी पक्षांमध्ये येणाऱ्यांचे स्वागत केले जाईल नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही उपस्थित राहणार आहे असे त्यांनी सांगितले.
आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे पक्षाला चांगले यश मिळावं त्यामुळे पक्ष वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारने ज्या योजना त्यांच्यासाठी केल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत आत्तापर्यंत पोहोचल्याच आहेत परंतु त्याला अजून गती देऊन लाभार्थींना अधिक लाभ कसा मिळेल या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला पाहिजे असे सांगून बावनकुळे पुढे म्हणाले की, भाजपाची निवडणूकीची तयारी झाली आहे. निवडणूकांसाठी आम्ही सज्ज आहोत. मोदी सरकारला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला १५० दिवसांचा कार्यक्रम दिला आहे. पुढील १५ दिवसांत आमचे कार्यकर्ते घरोघरी जाउन केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार प्रसार करतील.
आजच्या पर्यावरण दिनानिमित्त ‘एक पेड माँ के नाम’ हे अभियान आम्ही सुरू केले असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. आपल्या आईच्या नावाने प्रत्येक भाजप कार्यकर्ता एक झाड लावेल असे आवाहन त्यांनी केले. पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज आणि उध्दव ठाकरे एकत्र येण्याबाबत हालचाली सुरू असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, दोन्ही ठाकरे एकत्र येण्याने भाजपला कोणतेही आव्हान वाटत नाही. त्यांनी एकत्र यायचे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या नेत्यांनी याबाबत भूमिका घ्यायची आहे त्यात आम्हाला रस नाही. आम्ही आमच्या पक्षाचे काम करत आहोत. आमच्या पक्षाला येणाऱ्या काळात चांगलेच यश मिळणार आहे असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.
—————