Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मर्दानी पोवाडा गाणाऱ्या तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडमहाराष्ट्र

मर्दानी पोवाडा गाणाऱ्या तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन

Surajya Digital
Last updated: 2021/05/26 at 12:26 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

अहमदनगर : तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन भावपूर्ण श्रद्धांजली ! आपल्या अदाकारीने तमाशा जिवंत करणाऱ्या मर्दानी पोवाडा गाणाऱ्या तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन झाले असे कळले. त्यांच्या निधनाने वगनाट्य व तमाशा क्षेत्रातील एका युगाचा आज अस्त झाला आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळो हीच ‘सुराज्य डिजिटल ‘ परिवारातर्फे ईश्वरचरणी प्रार्थना ! भावपूर्ण श्रद्धांजली !

मोदी सरकार लवकरच करणार मोठी घोषणा ? होईल पॅकेजची घोषणा https://t.co/PDKsEm6hKP

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021

राज्यभर नावलौकिक असलेल्या तमाशासम्राज्ञी कांताबाई सातारकर (वय 85) यांचे मंगळवारी (दि. 25) सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास संगमनेर (जि. नगर) येथे निधन झाले. मूळच्या साताऱ्याच्या असलेल्या कांताबाई या संगमनेर येथे स्थायिक झाल्या होता.

ज्येष्ठ तमाशा कलावती कांताबाई सातारकर काळाच्या पडदयाआड.@DDNewslive @DDNewsHindi #KantabaiSatarkar pic.twitter.com/v3ecPZfeoN

— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) May 25, 2021

गेली काही दशके संगमनेरच्या सांस्कृतिक वारशाचा मानबिंदू राहिलेल्या ज्येष्ठ तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर(वय 82) यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. जन्मापासूनच प्रचंड खडतर आयुष्य वाट्याला आलेल्या कांताबाईंनी आपल्या जिद्दी स्वभावाच्या जोरावर अनेक संकटांवर मात करत आपल्या तमाशा फडाचे नाव राज्यभर गाजविले. राज्य शासनाच्या विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कारासह इतरही अनेक नामवंत पुरस्कार त्यांना मिळाले होते. 1939 साली जन्मलेल्या कांताबाई सातारकर यांनी वयाच्या 9 व्या वर्षी सातारा येथील नवझंकार मेळ्यातून रंगमंचावर पाऊल ठेवले होते. कौटुंबिक परिस्थिती बेतास बेत असताना स्वतः कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही, हे ओळखून तमाशा हाच आपले ध्येय मानत त्यानंतर राज्यभरातल्या छोट्या-मोठ्या तमाशा मंडळात त्यांनी आपल्या तमाशा कारकिर्दीचा प्रारंभ केला.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर (वय ८२) यांचे आज सायंकाळी संगमनेर येथे निधन झाले.

असंख्य पुरस्कार, असंख्य मानसन्मान मिळवलेल्या कांताबाई सातारकर यांना आकाशवाणी पुणे परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली…💐#KantabaiSatarkar pic.twitter.com/kiyAACdVwi

— Akashvani Pune (@akashvanipune) May 25, 2021

तमाशा हेच जीवनाचे सर्वस्व आहे हे 14- 15 वर्षाच्या कांताने ओळखले होते. आयुष्यभर गरिबीचे चटके सहन केलेल्या साहेबराव आणि चंद्राबाई यांनीही परिस्थितीचा स्वीकार केला होता. माणसाला आवश्यक असलेल्या अन्न-वस्त्र-निवारा या तिन्ही गोष्टी विनासायास मिळवून देणाऱ्या तमाशाकलेबरोबरच मुलीची जुळलेली नाळ त्यांनाही सुखावणारी होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यावेळी महाराष्ट्रात तुकाराम खेडकर तमाशा मंडळाचे नाव गाजत होते. सहाजिकच 1953 मध्ये कांताबाई तुकाराम खेडकर यांच्या तमाशा फडात दाखल झाल्या. पुढच्याच वर्षी म्हणजे 1954 साली त्यांनी तुकाराम खेडकर यांच्याशी विवाह देखील केला. तुकाराम खेडकर यांच्या तमाशा फडात त्यांनी 50 हून अधिक सामाजिक, राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक वगामधून त्यांनी प्रमुख भूमिका साकारली.

कोरोना संकट : पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीबाबत मोठा आदेश, ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर https://t.co/DhTWz54LlL

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021

खेडकर यांच्या निधनानंतर कांताबाईवर पुन्हा उपासमारीची वेळ येऊन ठेपली. त्यावरही मात करत न डगमगता आपला तरुण मुलगा रघुवीर खेडकर याला साथीला घेत त्यांनी ‘कांताबाई सातारकर सह रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ’ हा तमाशा फड उभा केला. गेली अनेक दशकं महाराष्ट्राच्या गावागावात हा तमाशा फड राज्यातील एक लोकप्रिय तमाशा म्हणून लौकिकास आला. रायगडची राणी या वगनाट्यतील ‘सोयराबाई’ आणि डोम्या नाग या वगनाट्यतील ‘बायजा’ या त्यांच्या भूमिका उभ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतल्या.

आपल्या अदाकारीने तमाशा जिवंत करणाऱ्या, मर्दानी पोवाडा गाणाऱ्या तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन झाले असे कळले. त्यांच्या निधनाने वगनाट्य व तमाशा क्षेत्रातील एका युगाचा आज अस्त झाला आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/m37t1IV8g0

— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 25, 2021

वृद्धापकाळामुळे गेल्या काही वर्षांपासून त्यांनी अभिनय करणे बंद केले होते. परंतु राज्याच्या दौर्‍यावर फड जात असताना त्या स्वतः दौऱ्यात सहभागी होत असत. संपूर्ण फडात त्यांचा आदरयुक्त दरारा असे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या, त्यातच त्यांना कोरोनाची ही लागण झाली होती. त्यांच्या पश्चात तमाशा सम्राट रघुवीर खेडकर, अलका, अनिता आणि मंदा यांच्यासह जावई , नातवंडे असा मोठा परिवार आहे.

महाराष्ट्राची लोककला जपणाऱ्या व सर्व आयुष्य या लोककलेचा वारसा जपणयासाठी घालवणाऱ्या जेष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली 🙏 pic.twitter.com/E4Kk5czE7y

— Sunanda Pawar (@sunanda_pawar) May 26, 2021

* कांताबाईची अनेक रूपे मनाला करतात व्याकूळ

एका गरीब कुटुंबातील नऊ वर्षांची मुलगी स्वयंप्रेरणेने तमाशात नाचायला उभी राहते, यात स्वत:चा स्वार्थ किंवा आनंदापेक्षा घरच्यांची काळजी महत्त्वाची मानणारी छोटीशी कांता… पतीच्या निधनानंतर अनेक संकटांचा सामना करीत स्वत:चा फड उभा करणारी कांता… तमाशा सुरू असताना झालेल्या अपघातात एक जुना सहकारी गमावल्यानंतरही तमाशा चालूच ठेवण्याचा आदेश देऊन जखमी नातवाला मांडीवर घेऊन दवाखान्यात घेऊन जाणारी कांता… सुनेच्या निधनानंतर सहाव्या दिवशी मुलांना धीर देऊन तमाशाच्या बोर्डावर उभी करणारी कांता… कलावती, पत्नी, आई, आजी अशा अनेक रूपांतली कांता निश्चितच प्रेरणा देणारी आहे.

पुरुषप्रधान संस्कृतीला बळी पडून आपल्याच नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नात करवलीसारखी मिरवणारी आणि नंतर मनातला उद्रेक शरीरावर ओसंडून स्वरूपाला निरोप देणारी कांताबाईची अनेक रूपे मनाला व्याकूळ करतात आणि उभारीही देतात. चित्रमहर्षी भालजी पेंढारकरांचे चित्रपटासाठी अभिनय करण्याचे, सोन्याच्या ताटाचे निमंत्रण कांताबाईच्या नकळत नवरा नाकारतो तेव्हा नवऱ्याचा नाइलाज समजून घेऊनही कांताबाई हुरहुरतातही आणि मुलगा रघुवीर समर्थपणे फड चालवित होते.

जेष्ठ तमाशा कलावंत आणि वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर ह्यांचे निधन🙏कांताबाईंनी तमाशा जगवला आणि वाढवला.त्यांना विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता.आमची भेट झाली तेव्हा हे पुस्तक त्यांनी मला भेट दिलं. #म #मराठी #तमाशा #Rip pic.twitter.com/o7sPjyP9jB

— Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) May 26, 2021

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #TamashaEmpress #KantabaiSatarkar #sang #MardaniPovada #passedaway, #मर्दानीपोवाडा #गाणाऱ्या #तमाशासम्राज्ञी #कांताबाईसातारकर #निधन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोदी सरकार लवकरच करणार मोठी घोषणा ? होईल पॅकेजची घोषणा
Next Article फेसबूक, ट्विटर, इन्टाग्रामवरून का सुरु आहे वाद? केंद्र सरकारच्या कारवाईकडे लक्ष

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?