तंजावर, 22 मे (हिं.स.) : तामिळनाडूमध्ये तंजावर-तिरुचिरापल्ली राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. सेंगकीपट्टी पुलाजवळ सरकारी बस आणि खासगी टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत 5 जणांचा मृत्यू झाला.
तंजावरच्या जिल्हाधिकारी प्रियंका बालसुब्रमण्यम यांनी या अपघाताची माहिती देताना सांगितले की, हा अपघात बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
——————————