Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुढील तीन तासांत आणखी तीव्र होणार चक्रीवादळ, सिंधुदुर्गातील 38 गावांना अलर्ट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

पुढील तीन तासांत आणखी तीव्र होणार चक्रीवादळ, सिंधुदुर्गातील 38 गावांना अलर्ट

Surajya Digital
Last updated: 2021/05/15 at 6:15 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

नवी दिल्ली / मुंबई : तौत्के चक्रीवादळ सक्रिय झालं आहे. यामुळे महाराष्ट्र, गुजरात, केरळ, गोवा राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पुढच्या 3 तासांत हे वादळ अधिक तीव्र रुप धारण करेल. सध्या वादळ ताशी 13 किलोमीटर वेगाने मुंबई, गोव्याच्या दिशेने येत आहे. तसेच, आगामी 12 तासांत हे चक्रीवादळ अति तीव्र रुप धारण करेल, असा अंदाज आहे. हे चक्रीवादळ सध्या गोव्यापासून 290 किमी, मुंबई 650 किमी तर गुजरातपासून 880 किलोमीटर अंतरावर आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या लहान भावाचे कोरोनाने निधन https://t.co/Y8hBlPmgjr

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021

अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. येत्या 12 तासात चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टीवर प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

Tautkae Cyclone 📢
Mumbai & around nxt 2 days there could be stormy winds over coast, heavy rains at isol places possible, Very rough sea, Don't go near beaches. Loose structures stand away.Tall tower construction crane operations, be careful. Trees🌴🌳🌲too.
Pl see IMD updates

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 15, 2021

तौत्के चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकणार नसले तरी किनारपट्टीच्या भागात त्याचा प्रभाव जाणवणार आहे. त्यामुळे चक्रीवादळा संबधी गावोगाव जनजागृती सुरु आहे. मुंबई,कोकण आणि इतर भागात जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस हे महत्वाचे आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी केले आहे.

बारावीच्या परीक्षा रद्द करा, सुप्रीम कोर्टात याचिका https://t.co/vxl8lnBdwm

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021

औरंगाबाद शहरात तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. ‘तौत्के’ चक्रीवादळाचा औरंगाबादलाही फटका बसला आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या आहे. पुढील तीन ते चार दिवस अशाचप्रकारे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतोय. चक्रीवादळाच्या परिणामाला सुरुवात झाली आहे. दक्षिण रत्नागिरी परिसराला पावसाने झोडपलं असून अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

Cyclonic Storm "Tauktae" latest updates from IMD pic.twitter.com/FwGeMNbQtz

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 14, 2021

केरळमधील एर्नाकुलम, त्रिशूर, इडुक्की आणि पलक्कड या जिल्ह्यांमध्ये 20 सेमीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

चक्रीवादळासंबंधी गावोगाव जनजागृती, बाणकोट, मंडणगड, महाराष्ट्र राज्यात शासनाची अत्यंत जय्यत तयारी चालू आहे. हवामान विभागाच्या होसाळीकरांकडून ट्वीट केले आहे.

#CycloneTauktae

Update @8am@MahaDGIPR @Indiametdept @IMDWeather @DMRatnagiri @RatnagiriPolice @DDSahyadri @AirRatnagiri @akashwanimumbai @MiLOKMAT pic.twitter.com/9cnsjyqNmt

— DISTRICT INFORMATION OFFICE, RATNAGIRI (@InfoRatnagiri) May 15, 2021

* सिंधुदुर्गातील 38 गावांना अलर्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन पूर्णपणे तयार आहे. या चक्रीवादळाच्या तडाख्याने कोविड रुग्णालय किंवा ऑक्सिजन यंत्रणा सुसज्य रहावी यासाठी जनरेटर ठेवण्यात आले आहेत. जेणेकरुन विद्युत पुरवठा खंडित न होता कोविड रुग्णांवर उपचार सुरु राहातील असं नियोजन केलं आहे. हे वादळ सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर आल्यास वेंगुर्ले, मालवण, देवगड या तिन्ही तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील किनारपट्टीवरील 38 गावांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या वादळाचा काळ तीन दिवसाचा आहे. त्यामुळे किनारपट्टीसह जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे आणी प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. एनडीआरएफची टीम जिल्ह्यात तैनात करण्यात आली नाही, मात्र आवश्यक असल्यास एनडीआरएफची टीम पुण्यात तयार असून मागवण्यात येईल.

“आपत्कालीन बचाव इत्यादीसाठी सुमारे 100 लाईफगार्ड्स विविध समुद्रकिनार्‍यावर तैनात करण्यात आले आहेत. अग्निशामक दलाचे जवानही सज्ज आहेत. आज आणि उद्या वाहतुकीसाठी वांद्रे-वरळी सी लिंक बंद राहील”

किशोरी पेडणेकर – महापौर, मुंबई

You Might Also Like

पंतप्रधान मोदी-फिजी पंतप्रधान राबुका यांची चर्चा; सात करारांवर स्वाक्षऱ्या

देशात मुसळधार पावसाचा कहर; राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे लखनऊमध्ये भव्य स्वागत

मेळघाटातील कुलांगणा खुर्द गावात ४० घरे आजही अंधारात; ५० वर्षांपासून वीज नाही

“स्वस्त तेल मिळेल तिथून खरेदी करू” – भारताच्या राजदूतांचे अमेरिकेला स्पष्ट सांगणे

TAGGED: #Next #threehours #intense #hurricane, #TauktaeCyclone #तौत्केचक्रीवादळ, #पुढील #तीनतासांत #तीव्र #चक्रीवादळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या लहान भावाचे कोरोनाने निधन
Next Article बापरे ! गंगा नदीतून २ हजारांच्यावर मृतदेह काढले बाहेर

Latest News

मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू
महाराष्ट्र August 25, 2025
अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन
महाराष्ट्र August 25, 2025
पंतप्रधान मोदी-फिजी पंतप्रधान राबुका यांची चर्चा; सात करारांवर स्वाक्षऱ्या
देश - विदेश August 25, 2025
देशात मुसळधार पावसाचा कहर; राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत
देश - विदेश August 25, 2025
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर मेघांची सावट
महाराष्ट्र August 25, 2025
प्ले ग्रुप, नर्सरीवर सरकारची राहणार विशेष नजर
महाराष्ट्र August 25, 2025
आमदार अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्षपदी
महाराष्ट्र August 25, 2025
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे लखनऊमध्ये भव्य स्वागत
देश - विदेश August 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?