Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘तौत्के’: महाराष्ट्रात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू, नऊजण जखमी, पुढचे काही तास धोक्याचे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

‘तौत्के’: महाराष्ट्रात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू, नऊजण जखमी, पुढचे काही तास धोक्याचे

Surajya Digital
Last updated: 2021/05/17 at 7:38 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई : राज्यात ‘तौत्के’मुळे हाहाकार माजला आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालंय. आतापर्यंत रायगड मध्ये 3 तर जळगावात दोघांचा मृत्यू झाला आहे. पुढच्या काही तासांत मुंबईत जोरदार वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस पडेल. घराबाहेर पडू नये, सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, असं आवाहन करण्यात आलंय. तसेच, रायगडला रेड अलर्ट असून तिथे सिंधुदुर्ग पेक्षा भयानक स्थिती निर्माण होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

तोक्ते चक्रीवादळ – वीज गेली, नो मोबाईल नेटवर्क, नो इंटरनेट; मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टी https://t.co/TQ4FdCFP3Y

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021

तौत्के चक्रीवादळाने महाराष्ट्रात दाणादाण उडवली. राज्यात दिवसभरात 6 नागरिकांचा मृत्यू झाला. मुंबईसह राज्याच्या किनारपट्टी भागात दिवसभर जोरदार पाऊस कोसळला. सध्या वादळ मुंबईपासून पुढे सरकलं आहे. हे चक्रीवादळ रात्री 8 ते 11 दरम्यान गुजरातमध्ये धडकण्याची चिन्हं आहेत. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे वादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकलं आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना वादळाचा मोठा फटका बसला आहे. वसईच्या भोयदापाडा येथे गाळ्याच्या बांधकामाचा सिमेंटचा दगड अंगावर पडल्याने कामगाराचा जाग्यावरच मृत्यू, सोसाट्याचा वारा आणि पावसात गाळ्यावरील पत्रे उडाले, वाऱ्याने सिमेंटचा दगड अंगावर पडला, यामध्ये अलबु प्रसाद यादव (वय 40) या कामागाराचा मृत्यू झाला.

मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, खवळलेला हा समुद्र #mumbai #surajyadigital #पाऊस #rain #सुराज्यडिजिटल #मुंबई #समुद्र pic.twitter.com/XfHzAoQ7jg

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021

तौत्के चक्रीवादळाचा परिणाम मुंबई आणि उपनगरांमध्ये आज सोमवारी दुपारनंतर जास्त जाणवू लागला आहे. किनाऱ्याजवळ तर तुफान वेगाने वारे वाहात आहेत. वाऱ्याचा वेग काही ठिकाणी ताशी 120 किमी पर्यंत गेल्याची नोंद झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आणि रस्ते बंद झाले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

घरात जागा नसल्याने 'शिवा' झाला झाडावर १८ दिवस 'क्वारंटाईन' https://t.co/bTMsI72vsc

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021

पावसाचा जोरही वाढत आहे. यामुळे अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. वादळाचा परिणाम उद्या मंगळवारपर्यंत जाणवण्याचा अंदाज आहे.

तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. पंतप्रधानांकडून वादळाचा आढावा घेतला गेला. तौत्के चक्रीवादळाने महाराष्ट्रात दाणादाण उडवली. दर तासाला अधिक सक्रीय होणाऱ्या या वादळाचा कोकणला मोठा फटका बसला. मच्छिमार, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. चक्रीवादळामुळे दर्याला उधाण आलं असून अनेक ठिकाणी किनाऱ्यावर उभ्या नौकांना फटका बसलाय. देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या 2 बोटी वाहून गेल्या आहेत. यात एका खलाशाचा मृत्यू झाला आहे.

#Gateway_of_India का नजारा !
मां भगवती कृपा करे ! #TauktaeCyclone #MumbaiRains #mumbaicyclone #cyclonetaukate @DCsofIndia @supriyasahuias @RubikaLiyaquat pic.twitter.com/u7BzOH6jYV

— AJAY AWASTHI (@AJAYAWASTHI108) May 17, 2021

महाराष्ट्रात दाणादाण उडवून दिली. राज्यात दिवसभरात 6 नागरिकांचा मृत्यू  झाला.  चक्रीवादळामुळे मुंबईसह राज्याच्या किनारपट्टी भागात दिवसभर जोरदार पाऊस कोसळला. सध्या वादळ मुंबईपासून पुढे सरकलं आहे. हे चक्रीवादळ रात्री 8 ते 11 यादरम्यान गुजरातमध्ये धडकण्याची चिन्हं आहेत.

कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असेलल्या तौत्के चक्रीवादळानं गती घेतल्यामुळं त्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील जवळपास सगळ्या गावांना बसलाय. त्यामुळे किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान झालीय. नवी मुंबईतील एपीएमसी दाना मार्केटमध्ये गाड्यांवर छप्पर कोसळले, छप्पर कोसळल्याने गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, पाच ते सहा गाड्यांवर पत्रा पडल्याने नुकसान, यात एक वॅगनार, एमजी हेक्टर, एक्स यू व्ही 500 आणि रिक्षाचे नुकसान, चक्रीवादळाने नवी मुंबईत अनेक झाडं उन्मळून पडली.

Cleared Siddharth Nagar Rd with the Help of Fire Fighters & BMC #SevaHiSangathan #BJYMCares #mumbairain #mumbaicyclone #MumbaiRains #TauktaeCyclone #SevaHiSanghathan #SevaHiSangathan2 .
.@BJP4India @BJYM @BJP4Maharashtra @BJYM4MH @bjp4mumbai @BJYM4Mumbai @narendramodi @AmitShah pic.twitter.com/t0nj1ulA81

— Adv. Shubham Bhave (@i_ShubhamBhave) May 17, 2021

या वादळामुळे एकूण 6 मृत्यू झाले असून 9 जण जखमी झाले आहेत. एकूण 12 हजार 500 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये काही नुकसान व पडझड झाली असली तरी कोविड रुग्णालयांना वीज पुरवठा खंडित होऊ देण्यात आलेला नाही त्याचप्रमाणे पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था सक्षमपणे सुरु आहे याविषयीही मुख्यमंत्र्यांनी घेतली.

Its very heartening to know that Hon Dy CM Sir remembered me & India Met Department & praised for IMD's Weather Services to Maharashtra, even under the difficult situations since last more than a year
Hon Sir, IMD will continue to give its best services to the state & country🇮🇳.

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 17, 2021

You Might Also Like

नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

TAGGED: #Tautke #6killed #9injured #Maharashtra, #तौत्के #महाराष्ट्रात #आतापर्यंत #6जणांचा #मृत्यू #नऊजण #जखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article घरात जागा नसल्याने ‘शिवा’ झाला झाडावर १८ दिवस ‘क्वारंटाईन’
Next Article म्युकरमायकोसिसचा धोका वाढला, 12 रुग्णांचा मृत्यू, दोन दिवसात 70 रुग्ण दाखल

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?