Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात जुगार खेळताना शिक्षकासह चौघांना पकडले तर पाचजण फरार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापुरात जुगार खेळताना शिक्षकासह चौघांना पकडले तर पाचजण फरार

Surajya Digital
Last updated: 2022/02/15 at 11:13 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

□ पाटबंधारे विभागाच्या जागेत जुगाराचा खेळ

सोलापूर : जुगाराची चटक ही उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू पेशालाही सोडत नाही. नविन पिढी घडवण्याचे काम करणारे शिक्षक ही या जुगाराच्या आहेरी गेले आहेत. अशा काही मोजक्याच महाभागांमुळेच शिक्षक पेश्याला काळीमा फासली जात आहे. हा प्रकार सोलापुरात घडला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथे जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात एका झेडपी शिक्षकासह 4 जणांना रंगेहाथ पकडण्यात आले.
इतर 5 जण मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. यात 9 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पळून जाणाऱ्यांची नावे निष्पन्न झाली आहेत.

या कारवाईत 2 लाख 7 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, कचरेवाडी येथे दिलीप रामचंद्र मेटकरी यांच्या घरासामोर पाटबंधारे विभागाच्या जागेत काही लोक पत्त्याच्या पानावर पैसे लावून जुगार खेळत असल्याने तेथे छापा टाकला. यावेळी तेथे काही लोक जुगार खेळताना मिळून आले.

Four people, including a teacher, were caught gambling in Solapur while five others escaped

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

यामध्ये दिलीप रामचंद्र मेटकरी (वय ६४), दत्तात्रय श्रीमंत आवळेकर (वय ४२), दत्तात्रय अंकुश माने, सीताराम मोहन फटे (वय ५४, सर्व रा. कचरेवाडी, ता. मंगळवेढा) यांना जागीच पकडले. तसेच पळून गेलेल्यांमध्ये उमेश उत्तम गवळी (रा. भालेवाडी), बबलू सीताराम शिंदे, लाला काळुंगे, महीपती अंकुश माने, पिंटू माने (सर्व रा. कचरेवाडी) यांचा समावेश आहे. त्यांच्यासमोर पत्त्याची पाने, रोख १५ हजार ५५० रुपये, चार मोटारसायकली व तीन मोबाईल असा २ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, सहायक पोलीस निरीक्षक आमोल बामणे, उपनिरीक्षक विजय वाघमारे, पोहेकॉ. महेश कोळी, पो.ना. विठ्ठल कोळी, पो.कॉ. सोमनाथ माने, पोकॉ मळसिद्ध कोळी व चालक पो.काॅ. समाधान यादव यांनी पार पाडली.

● साखर कारखान्याच्या वॉचमनला काठीने मारहाण; एकावर गुन्हा
सोलापूर : दहिटणे (ता.अक्कलकोट) येथील साखर कारखान्याचे वॉचमन सिद्धाराम भिमशा चव्हाण (वय५० रा.अक्कलकोट) यांना अनोळखी इसमाने काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना काल सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. त्यांना अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात सुवर्णा (पत्नी) यांनी दाखल केले. तालुका पोलिसात याची नोंद झाली आहे .

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Four #people #teacher #gambling #Solapur #escaped, #सोलापूर #जुगार #शिक्षकासह #चौघा #पाचजण #फरार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दूध संघ निवडणूक : 16 जागेसाठी 31 उमेदवार रिंगणात, दिलीप मानेंचा निवडणुकीला नकार तर हसापुरेंची माघार
Next Article बॉलिवूडचा गोल्डमॅन हरपला, बप्पी लहरीचं मुंबईत निधन

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?