Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तेलंगणा : केमिकल फॅक्ट्रीत स्फोट, १० जणांचा मृत्यू तर अनेक जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

तेलंगणा : केमिकल फॅक्ट्रीत स्फोट, १० जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

admin
Last updated: 2025/06/30 at 5:08 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

हैद्राबाद, 30 जून (हिं.स.)।तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील एका केमिकल कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या घटनेत किमान १० जणांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत.जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पाटण चेरू मंडळातील सिगाची केमिकल्स इंडस्ट्रीमध्ये हा स्फोट झाला.हा स्फोट सकाळी ७ वाजता झाला. कामगार कारखान्यात काम करत असताना अचानक स्फोट झाला. मोठा स्फोट ऐकून कर्मचारी घाबरुन बाहेर पळाले. स्फोटानंतर अनेक कामगार त्यात अडकले, त्यापैकी किमान १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.ढिगाऱ्याखालून 5 कामगारांचे मृतदेह सापडले आहेत.तर १३ जणांना वाचवण्यात आले आहे. तसेच अनेकजण गंभीर जखमी आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मृतांचा आकडा वाढू शकतो. त्याचबरोबर ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची माहिती मिळत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र माहितीनुसार, रिअ‍ॅक्टरमध्ये अचानक रासायनिक प्रतिक्रिया वेगाने झाल्यामुळे स्फोट झाला असावा. त्यानंतर आगीने रौद्र रुप धारण केले. हा संपूर्ण परिसर आगीच्या विळख्यात आला. संगारेड्डीचे पोलीस

अधीक्षक परितोष पंकज यांनी सांगितले की, हा स्फोट इतका मोठा होता की परिसरात दहशत निर्माण झाली होती. या स्फोटानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट दिसत होते. आगीच्या ज्वाळांनी कारखान्याला पूर्णपणे वेढले. यात 10 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 11 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. सिगाची फार्मा कंपनी, पासामैलाराम फेज-1 येथे घडली. अग्निशमन 11गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.सुमारे 20 लोक जखमी झाले असूनप्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.

You Might Also Like

पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही

ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

इंडोनेशिया : बतिक एअर कंपनीच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला

येत्या ५ तारखेला मोर्चाऐवजी विजयी मेळावा होणार – राज ठाकरे

अझहर महमूद पाकिस्तान क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सीमेजवळ घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी गाईडला भारतीय लष्कराने घेतले ताब्यात
Next Article अझहर महमूद पाकिस्तान क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?