सोलापूर, 3 एप्रिल (हिं.स.)।
सोलापूर शहर व परिसराच्या तापमानात आज कमालीची घट बघायला मिळाली. सोलापुरात ४०.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. मंगळवारच्या तुलनेत आज सोलापूरच्या तापमानात २.१ अंश सेल्सिअसची घट झाली. आज सोलापुरात ३८ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. ढगाळ वातावरणामुळे आज सोलापुरात नेहमीपेक्षा उन्हाचा चटका कमी होता.
२८ मार्चपासून सोलापूर शहर व परिसरात कायम ४० ते ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानाचा वाढलेला पारा, उकाडा यामुळे उन्हाळा असहाय्य होत होता. गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर शहर व परिसराच्या वातावरणात बदल होताना दिसला. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण झाल्याने उन्हाचा तडाखा कमी झाला होता.