Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: टेनिसपटू सानिया मिर्झाने जाहीर केली निवृत्ती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

टेनिसपटू सानिया मिर्झाने जाहीर केली निवृत्ती

Surajya Digital
Last updated: 2022/01/19 at 6:43 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : भारताची टेनिस सुपरस्टार सानिया मिर्झाने खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन खेळण्यासाठी पोहोचलेल्या सानिया मिर्झाने म्हटले की, हा तिचा शेवटचा सीजन last sesion असेल. म्हणजेच 2022 मध्ये सानिया मिर्झा टेनिस कोर्टमध्ये tenis court शेवटची दिसणार आहे. सानियाला ऑस्ट्रेलियन ओपनच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांनतर तिने सांगितले की, हा तिचा शेवटचा सिझन असेल.

सानिया मिर्झा हिने महिला डबल्समध्ये 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2015 मध्ये विम्बलडन आणि यूएस ओपन या स्पर्धा जिंकल्या आहेत. तसंच मिक्स्ड डबल्समध्ये तिने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 मध्ये फ्रेंच ओपन आणि 2014 मध्ये यूएस ओपन UAS open या स्पर्धा जिंकल्या आहे. 2013 मध्ये सानियाने एकेरी खेळणे सोडले. तेव्हापासून ती फक्त दुहेरीत खेळत होती.

एकेरीत खेळतानाही सानियाने बरेच यश success मिळवले होते. तिने अनेक बड्या टेनिसपटूंना पराभूत करून 27 व्या क्रमांकावर पोहोचले होते. 35 वर्षीय सानिया मिर्झा भारताची लोकप्रिय टेनिस खेळाडू राहिली आहे. सानिया मिर्झाने आतापर्यंतच्या कारकीर्दीत अनेक किताब मिळवले आहेत. आपल्या कामगिरीतून उदयोन्मुख खेळाडूंनाही प्रेरणा दिली. Tennis player Sania Mirza announces retirement

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

#SaniaMirza, the most successful woman in Indian tennis history, decides that she is bidding adieu to sports at the end of 2022.

35-year-old had already bowed out of singles competitions in 2013. @MirzaSania has 6 Grand Slam titles in women's doubles & mixed doubles to her name. pic.twitter.com/OHFoXcFn83

— All India Radio News (@airnewsalerts) January 19, 2022

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

सानिया मिर्झा Sania Mirza हिने निवृत्तीची घोषणा केली. ऑस्ट्रेलियन ओपन 2022 Australian Open मध्ये महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर तिने हा निर्णय decision घेतला.

सानिया Sania Mirza पुढे म्हणाली की, मला कमबॅकला जास्त वेळ लागतोय. मला वाटतं, माझा मुलगा तीन वर्षांचा आहे. मी त्याच्याबरोबर एवढा प्रवास journey  करून त्याला धोक्यात घालत आहे, हे मी लक्षात घ्यायला हवं. तसेच माझं शरीर  साथ देत नाही. आज माझा गुडघा दुखत होता. मला वाटतं की जसजसे माझं वय age वाढत आहे, तसतसे बरे होण्यास वेळ लागत आहे. सानिया मिर्झा Sania Mirza 2003 पासून व्यावसायिक दौऱ्यावर टेनिस खेळत आहे.

सानिया मिर्झा म्हणाली, ”मी ठरवलं आहे की हा माझा शेवटचा सीजन असणार आहे. मी या सीजनमध्येही पूर्णपणे खेळू शकेन का? हे ही मला माहित नाही. स्लोवेनियाच्या काजा जुवान आणि तमारा जिदानसेक यांनी पहिल्या फेरीत डैवैत सानिया आणि किचेनोक यांना 6-4 आणि 7-6 अशा दोन सेट्समध्ये मात दिली.

ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सामना पराभूत झाल्यानंतर सानिया म्हणाली, ‘निवृत्ती घेण्याची काही कारणं आहेत. मला वाटतं मला सामन्यासाठी पूर्ण फिट होण्यासाठी मला अधिक वेळ लागत आहे. मी इतका प्रवास करुन माझ्या 3 वर्षाच्या मुलाची प्रकृतीही धोक्यात टाकत आहे. मला वाटतं माझी प्रकृती नीट साथ देत नसून गुडघेही फार दुखतात. त्यामुळेच मला सामन्यासाठी फिट होण्यास जास्त वेळ लागत आहे.’

आपल्या खेळाबरोबरच सानिया मिर्झा इतर गोष्टींमुळे चर्चेत राहिली. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत लग्न करण्याच्या निर्णयामुळे सानियाला टीकेचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर सुरूवातीच्या काळात राष्ट्रगीतावरून झालेल्या वादामुळे सानियावर टीका झाली होती.

You Might Also Like

दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद

बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

लखनौला हरवून आरसीबी क्वालिफायर १ मध्ये दाखल

आयपीएल गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशीचे बिहारमध्ये जंगी स्वागत

TAGGED: #Tennis #player #SaniaMirza #announces #retirement, #टेनिसपटू #सानियामिर्झा #जाहीर #निवृत्ती #टेनिसपटू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article श्रुती हसनसाठी पत्नी ऐश्वर्याला सोडणार धनुष, सर्वत्र चर्चेला उधाण
Next Article माळशिरसमधील नगरपंचायतींवर मोहिते पाटील यांचे वर्चस्व

Latest News

‘जारण’ ने १२ दिवसांत कमावले ३.५ कोटी
महाराष्ट्र June 18, 2025
कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
भारत-कॅनडा करणार उच्चायुक्तांची पुनर्स्थापना
देश - विदेश June 18, 2025
ट्रम्प यांच्या पोस्टमुळे तेहरानमध्ये भीतीचं वातावरण, लोकांनी सोडले शहर
देश - विदेश June 18, 2025
जमियत उलेम-ए-हिंद कडून जातीय जनगणनेचे समर्थन
देश - विदेश June 18, 2025
भारतीय हवाई दलाला मिळणार ‘स्मार्ट वेपन’
देश - विदेश June 18, 2025
बिहार : वीज कोसळून 12 जणांचा मृत्यू
देश - विदेश June 18, 2025
नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र June 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?