Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दहावी – बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

दहावी – बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार

Surajya Digital
Last updated: 2022/02/23 at 6:09 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : दहावी-बारावीची ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. देशातील सर्व बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र अशा प्रकारची याचिका दिशाभूल करणारी आणि विद्यार्थ्यांना खोटी आशा दाखवणारी आहे, असे कोर्टाने म्हटले. त्यामुळे आता ठरलेल्या वेळापत्रकानुसार दहावी – बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत.

सुप्रीम कोर्टानं दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे. न्यायालयांनी अशा प्रकारच्या याचिकांची दखल घेतल्यास यंत्रणांमध्ये संभ्रम निर्माण होतो. या कशा प्रकारच्या याचिका आहेत, असा सवाल देखील सुप्रीम कोर्टानं विचारला आहे. संबंधित यंत्रणांना निर्णय घेऊ द्या, असं मत देखील सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं आहे.

सर्व राज्यांचे बोर्ड, सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती ए एम खानविलकर, दिनेश माहेश्वरी आणि सीटी रविकुमार यांनी ही याचिका फेटाळली आहे. गेल्या वर्षी कोरोना विषाणू संसंर्ग झाल्यामुळं परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता, असं निरिक्षण देखील सुप्रीम कोर्टानं नोंदवलं आहे.

Tenth – Twelfth exam will be offline

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द कराव्यात यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. ऑफलाईन परीक्षांना विरोध करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं भाष्य केलं आहे. परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिका या विद्यार्थ्यांमध्ये चुकीच्या आशा निर्माण करतात.

सर्व राज्यांचे बोर्ड, सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती.  ही याचिका फेटाळली आहे. गेल्या वर्षी कोरोना विषाणू संसंर्ग झाल्यामुळं परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. असं निरिक्षण देखील सुप्रीम कोर्टानं नोंदवलं आहे. त्यामुळं यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यार्थ्यांना आता आगामी काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सामोरं जावं लागलं आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत घेण्यात येतील. प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च मध्ये होतील. कोरोना आणि इतर कारणामुळं अडचण आल्यास 31 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील. दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत घेण्यात येणार आहेत. प्रात्याक्षिक, तोडी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत परीक्षा होईल. काही कारणामुळं प्रात्याक्षिक परीक्षा देता आली नाही तर 5 एप्रिल ते 22 एप्रिल पर्यंत होतील. मंडळाच्या परीक्षा ठरलेल्या काळातचं होतील.

 

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

TAGGED: #Tenth #Twelfth #exam #offline, #दहावी #बारावी #परीक्षा #ऑफलाईन #कोर्ट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मलिकांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा आंदोलन; शरद पवारांचा नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न
Next Article 10 – 12 परीक्षा ऑफलाईनच होणार, दुसरीकडे प्रश्नपत्रिका जळून खाक

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?