Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्रात भयंकर प्रकार, पैशासाठी डॉक्टरने 3 दिवस केले मृत रुग्णावर उपचार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

महाराष्ट्रात भयंकर प्रकार, पैशासाठी डॉक्टरने 3 दिवस केले मृत रुग्णावर उपचार

Surajya Digital
Last updated: 2021/05/20 at 1:08 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नांदेड : कोरोना रुग्णावर मृत्यूनंतरही 3 दिवस उपचार सुरू ठेवल्याचं उघडकीस आलं आहे. नांदेड येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अंकलेश पवार यांचा 21 एप्रिलला मृत्यू झाला होता. मात्र, केवळ पैसे उकळण्यासाठी त्यांचा मृत्यू 24 एप्रिलला झाल्याचे हॉस्पिटलकडून घोषित करण्यात आले.  पत्नी शुभांगी पवार यांनी याबाबत न्यायालयात दाद मागितली असता, जिल्हा न्यायालयाने गोदावरी हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1395233706843938816?s=19

कोरोना काळात खाजगी रुग्णालयात होत असलेल्या लुटीची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. परंतु बिलाची रक्कम येणे बाकी असल्याने मृत्यूनंतर ही एका कोरोना रुग्णावर तब्बल तीन दिवस उपचार करण्याचा प्रताप नांदेडमधील गोदावरी हॉस्पिटलने केला आहे. मयताच्या पत्नीने या विषयाचा भांडाफोड केला असून न्यायालयाच्या आदेशाने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1395218572956233728?s=19

मुजामपेठ येथील अंकलेश पवार यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांची पत्नी शुभांगी पवार यांनी त्यांना शहरातील गोदावरी हॉस्पिटलमध्ये 16 एप्रिल 2021 रोजी  दाखल केले होते. या ठिकाणी दाखल करताना त्यांच्याकडून अनामत म्हणून 50 हजार रुपये भरून घेण्यात आले. त्यानंतर सातत्याने त्यांची प्रकृती खालावत असल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यातच 20 एप्रिल रोजी त्यांना आयसीयूमध्ये हलविल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच दिवशी टॉमीझुलब नावाचे 35 हजार रुपयांचे इंजेक्शन द्यावे लागणार असून पैसे जमा करण्यास सांगितले होते. शुभांगी यांनी पैसे भरण्यासाठी मुदत मागितली होती, रुग्णालयाने त्यांना 24 एप्रिलपर्यंतची परवानगी दिली होती.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1395039057726480386?s=19

* आणखी 40 हजार रुपयांची मागणी

24 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता शुभांगी यांनी रुग्णालयात 90 हजार रुपये जमा केले. त्यानंतर दुपारी 12 वाजता त्यांना अंकलेश पवार यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शुभांगी यांनी डेड बॉडी आणि उपचाराच्या कागदपत्रे मागितली परंतु रुग्णालयाने ती देण्यास नकार दिला. त्यानंतर 26 एप्रिल रोजी त्यांना उपचाराची कागदपत्रे देण्यात आली. त्यात अंकलेश पवार यांचा 21 एप्रिल रोजी 12 वाजता निधन झाल्याची नोंद असल्याचे धक्कादायक पुढे आले. विशेष म्हणजे 21 ते 24 या तिन्ही दिवसांची उपचाराची बिले लावण्यात आली होती. अशाप्रकारे जादा बिल आकारून ही प्रेताची विटंबना केल्याने शुभांगी यांना धक्का बसला. त्यांनी मृत्यू प्रमाणपत्र मागितले असता आणखी 40 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणात शुभांगी यांनी ऍड शिवराज पाटील यांच्या मदतीने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गोदावरी हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1394996165108584458?s=19

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

TAGGED: #Terrible #type #Maharashtra #doctor #treated #deadPatient #3days #money, #महाराष्ट्रात #भयंकरप्रकार #पैशासाठी #डॉक्टरने #3दिवस #मृत #रुग्णावर #उपचार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान, मोदींनी गुजरातला जाहीर केले एक हजार कोटीचं पॅकेज
Next Article शेतकऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज, खताची बॅग 1200 रुपयांनी स्वस्त

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?