Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दहशतवादाला सीमा नाही, सर्व देशांनी एकत्रित लढा देण्याची गरज – डॉ. श्रीकांत शिंदे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

दहशतवादाला सीमा नाही, सर्व देशांनी एकत्रित लढा देण्याची गरज – डॉ. श्रीकांत शिंदे

Surajya Digital
Last updated: 2025/06/03 at 3:48 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

लायबेरिया, 3 जून (हिं.स.)। दहशतवाद सीमा ओलांडून पसरला आहे. भारताने सुरु केलेल्या दहशतवाद विरोधी मोहीमेत आता जगभरातील सर्व देशांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आलीय, असे सडेतोड मत भारतीय खासदांच्या शिष्टमंडळाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. लायबेरिया प्रजासत्ताकच्या संसदेला संबोधित करताना खासदार डॉ. शिंदे यांनी दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिका परखडपणे मांडली. या दौऱ्याच्या निमित्ताने सिएरा लिओन आणि लायबेरिया प्रजासत्ताक या पश्चिम आफ्रिकेतील दोन देशांच्या संसदेला संबोधित करण्याचा बहुमान मिळवणारे डॉ. श्रीकांत शिंदे हे एकमेव भारतीय खासदार ठरले आहेत.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, भारत मागील काही काळापासून दहशतवादी हल्ल्यांनी आणि सीमापार दहशतवादाने त्रस्त आहे. या छुप्या दहशतवादाची वस्तुस्थिती सांगण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय खासदार येथे आलो आहोत. सर्व राष्ट्रांना दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत भारतासोबत उभे राहण्याची विनंती करत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जागतिक पातळीवर दहशतवादविरोधी शून्य सहिष्णुता राबवण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

लायबेरिया प्रजासत्ताक संसदेचे सभापती रिचर्ड नाग्बे कून आणि उपसभापती थॉमस पी. फल्लाह यांनी भारतीय शिष्टमंडळाचे स्वागत केले. सिनेटचे अध्यक्ष न्यूब्ली कारंगा लॉरेन्स यांच्यासोबत झालेल्या बैठकीत डॉ. शिंदे म्हणाले की, पाकिस्तानला बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) अर्थसहाय्य मिळत आहे.

पाकिस्तानला ‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येही टाकण्यात आले होते. मात्र सर्व दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये फोफावतात, त्यांना पाकिस्तानकडून पाठिंबा आणि प्रायोजित केले जाते. त्यामुळे यावेळीही भारताने पाकिस्तानचा ‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्ये समावेश करावा, अशी मागणी केल्याचे खासदार डॉ. शिंदे यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, लायबेरियाच्या कठिण काळात भारताने नेहमीच सोबत केली. दोन्ही देशांचे खास संबंध आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य बनणाऱ्या लायबेरियाकडून दहशतवादाविरोधात आवाज उठवला जाईल, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

खासदार डॉ. शिंदे आणि शिष्टमंडळाने सोमवारी लायबेरिया प्रजासत्ताकचे अध्यक्ष जोसेफ न्युमा बोकाई तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्री साराह बेस्लो न्यान्ती यांच्याशी चर्चा केली. भारताच्या दहशतवाद विरोधी मोहीमाला लायबेरिया प्रजासत्ताकने भक्कम पाठिंबा दर्शवला असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.

लायबेरिया प्रजासत्ताक संसदेचे सभापती रिचर्ड नाग्बे कून म्हणाले की, दहशतवादाशी सामना करण्यासाठी पश्चिम आफ्रिकेतील चार देशांची एकजूट महत्वाची आहे. सिनेट वरिष्ठ सभागृहाचे प्रो-टेम्पोर अध्यक्ष न्योनब्ली करंगा-लॉरेन्स यांच्या आदेशाने यावेळी लायबेरियाच्या संसदेत पहलगाम हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना दोन मिनिटं मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जैश-ए-मोहम्मदचा वरिष्ठ कमांडर मौलाना अब्दुल अजीज इसारचा मृत्यू
Next Article मोरोक्को देशाचा ईदच्या दिवशी प्राण्याची कुर्बानी न देण्याचा निर्णय

Latest News

Почему переживание «почти получилось» мотивирует не сдаваться
Top News December 8, 2025
test
Top News December 7, 2025
test
Top News December 7, 2025
Roulette Real Money India with Jackpots
Top News December 7, 2025
Play Live Roulette UK for Beginners: A Comprehensive Guide
Top News December 7, 2025
Каким образом личные мотивы формируют действия
Top News December 7, 2025
Gentle Monster Eyewear Designer Glasses With KUN 2025 Moncler+Gentle Monster
Top News December 7, 2025
Vale Fresh Pieces Zip Up Hoodies
Top News December 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?