मुंबई, 15 जुलै (हिं.स.)। इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची जागतिक कंपनी टेस्लाने अखेर भारतात अधिकृत प्रवेश केला आहे. टेस्लाने आपले पहिले स्मार्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही मॉडेल Y भारतात लाँच केले असून, मुंबईच्या बीकेसी येथे कंपनीचे पहिले एक्स्पेरियन्स सेंटर मंगळवारी सुरु करण्यात आले. या सेंटरचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबईतील एक्स-शोरूम आणि ऑन-रोड किमती पुढीलप्रमाणे –
व्हेरिएंट एक्स- शोरूम ऑन- रोड किंमत
आरडब्ल्यूडी 59,89,000 रु 61,95,640 रु
एडब्ल्यूडी 67,89,000 रु 69,15,190 रु
टेस्ला मॉडेल Y ही इलेक्ट्रिक सयूव्ही भारतात पूर्णपणे आयात स्वरूपात आणण्यात आली असून, तिची आरडब्ल्यूडी व्हर्जनची किंमत ₹61.07 लाख, तर एडब्ल्यूडी व्हर्जन ₹69.15 लाख इतकी आहे. या किंमती ऑन-रोड असून, सध्या ही कार मुंबई, दिल्ली आणि गुरुग्राम येथे उपलब्ध आहे. कारची डिलिव्हरी 2025 च्या तिसऱ्या तिमाहीपासून सुरू होणार आहे.
टेस्ला मॉडेल Y ची वैशिष्ट्ये:
आरडब्ल्यूडी व्हर्जन 0 ते 100 किमी प्रतितास वेग फक्त 5.6 सेकंदांत घेते.
स्टँडर्ड आरडब्ल्यूडी मध्ये 60kWh LFP बॅटरी, ड्रायव्हिंग रेंज सुमारे 500 किमी.
एडब्ल्यूडी व्हर्जन मध्ये 75kWh NMC बॅटरी, एका चार्जमध्ये 622 किमी रेंज.
पाठीमागच्या प्रवाशांसाठी टचस्क्रीन व इलेक्ट्रिक ॲडजस्टेबल सीटस.
टेस्लाची सर्वाधिक विक्री होणारी गाडी, जागतिक पातळीवरही सर्वोत्तम विक्रीमध्ये गणना.
भारतात मॉडेल Y चा थेट सामना बीएमडब्ल्यू एक्स१ एलडब्ल्यूबी, व्होल्वो सी४०, बीवायडी सीलियन ७ आणि मर्सिडीज-बेंझ EQA यांच्याशी होणार.
रंग निवडताना किती खर्च?
टेस्ला मॉडेल Y खरेदी करताना ग्राहकांनी रंग निवडला, तर काही रंगांसाठी अतिरिक्त रक्कम भरावी लागणार आहे:
रंग अतिरिक्त किंमत
पर्ल व्हाइट मल्टी-कोट 95,000 रु
डायमंड ब्लॅक 95,000 रु
ग्लेशियर ब्लू 1,25,000 रु
क्विक सिल्व्हर 1,85,000 रु
अल्ट्रा रेड 1,85,000 रु
बुकिंग 22,000 रु मध्ये सुरू असून, ही रक्कम नॉन-रिफंडेबल आहे.
सुरक्षा आणि वैशिष्ट्ये:
मॉडेल Y मध्ये Level-2 ADAS तंत्रज्ञान, 8 एअरबॅग्स, प्रगत सेन्सर्स आणि फुली डिजिटल कॉकपिट अशा अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. ही कार Tesla Autopilot तंत्रज्ञानासह सुसज्ज आहे.
टेस्लाचे पुढचे पावले: सायबरकॅब आणि रोबोटव्हॅन
1. स्टीअरिंग व पेडलविना ‘सायबर कॅब’
Tesla लवकरच त्यांच्या रोबोटॅक्सी प्रकल्पांतर्गत ‘सायबर कॅब’ सादर करणार आहे.
यामध्ये स्टीअरिंग व्हील किंवा पेडल नसतील.
पूर्णतः स्वयं-चालित आणि एआय-नियंत्रित.
किंमत: $30,000 पेक्षा कमी (सुमारे 25 लाख रुपये).
प्रति किलोमीटर चालवण्याचा खर्च: 16 रुपये .
वायरलेस चार्जिंगची सुविधा दिली जाणार आहे.
2. 20 प्रवासी क्षमतेची ‘रोबोटव्हॅन’
टेस्लाने ‘रोबोटव्हॅन’ नावाचे ऑटोनॉमस वाहन देखील विकसित केले आहे.
ही व्हॅन 20 लोकांची वाहतूक करू शकते.
क्रीडा संघ, प्रवासी व सामान वाहतुकीसाठी उपयुक्त.
मस्क यांचा व्हिजन: ‘टॅक्सी ताफा’ नेटवर्क
एलन मस्क यांची योजना प्रत्येक टेस्ला वाहनधारकाला स्वतःची कार टेस्ला नेटवर्कवर टॅक्सी म्हणून नोंदवता येईल, अशी आहे. कार मालक वापरत नसताना त्यातून उत्पन्न मिळवू शकतात.