Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: केंद्र सरकारचा नव्या वर्षात वस्त्रोद्योगाला हादरा, 5 वरुन थेट 12 टक्के जीएसटीत वाढ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थसोलापूर

केंद्र सरकारचा नव्या वर्षात वस्त्रोद्योगाला हादरा, 5 वरुन थेट 12 टक्के जीएसटीत वाढ

Surajya Digital
Last updated: 2021/11/22 at 3:49 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : वाढत असलेले विजेचे दर, कामगारांच्या पगारात झालेली वाढ, अनुदानातील अनियमितता, उत्पादन खर्चातील मोठी वाढ, डिझेल दरामुळे वाढलेला वाहतूक दर आणि कोरोना महामारी यासर्व संकटात वस्त्रोद्योग अडचणीत आला आहे. आता नवीन वर्षात जीएसटीत वाढ करुन केंद्र सरकारने वस्त्रोद्योगाला चांगलाच हादरा दिला आहे.

पाच टक्क्यांवरून 12 टक्के जीएसटीची आकारणी करण्याचा अंतिम निर्णय झाला आहे. जानेवारीपासून याची अंमलबजावणी करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. याचा फटका केवळ सोलापूरलाच नव्हे, तर संपूर्ण देशातील वस्त्रोद्योगाला बसणार आहे.

केंद्र सरकारने पूर्वीच्या 5 टक्क्यांऐवजी 12 टक्के जीएसटी आकारणीचा निर्णय घेतल्याने वस्त्रोद्योगावर आणखी संकट वाढणार आहे. वस्त्रोद्योगोवरील जीएसटी वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे संपूर्ण कापड व्यापार आणि उद्योग हादरला आहे. आधीच कापड उद्योगाला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. अशाही स्थितीत हा उद्योग संघर्ष करत सासवरत आहे. अशा स्थितीत कापडावरील कर दरामध्ये मोठी वाढ केल्याने आता उत्पादन खर्च वाढणार आहे. याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.

कृषी, आरोग्य आणि शिक्षणावर कोणताही कर नाही. निवासी घरांवर सरकार अनुदान देत आहे आणि कर 1 आणि 5 टक्के इतके आहे. मूलभूत गरज असलेल्या कपड्यांवर 12 टक्के कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी जानेवारी 2022 पासून होणार आहे. कापड, फॅब्रिक्सवर अनेक वर्षांपासून कोणताही कर नव्हता. आता केंद्र सरकार कापड उद्योगाला कराच्या जाळ्यात आणत आहे. यामुळे या उद्योगाला मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मागील जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर देशातील व्यापारी संघटनांनी तत्काळ निवेदन दिले होते. त्यात कापडावरील इन्व्हर्टेड ड्युटी संरचना दुरुस्त करण्याचा प्रस्ताव दिला होता. यात 5 टक्के कर कायम ठेवावा, अशी मागणी करण्यात आली होती, तरीही 18 नोव्हेंबर रोजी अधिसूचना जाहीर करत पाच टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे लहान व्यावसायिकांवर वाईट परिणाम होणार आहे.

पूर्वी टेरीटॉवेल, चादर आणि वस्त्रोद्योग उत्पादनावर एक हजारावर 5 टक्के कर होता, तर आता सरसकट 12 टक्के कर आकारणी करण्यात येणार आहे. व्यावसायिकांच्या स्टॉकमध्ये पडून असलेल्या आणि मूळ किमतीवर विकल्या गेलेल्या मालाचा 7 टक्के अतिरिक्त बोजा व्यावसायिकांवर पडणार आहे. कर दरातील या वाढीमुळे देशांतर्गत व्यापारालाच बाधा येणार नाही, तर निर्यातीवरही विपरित परिणाम होणार आहे.

व्हिएतनाम, इंडोनेशिया, बांगलादेश आणि चीनसारख्या देशांच्या तुलनेत आपल्या देशातील कापड उद्योग सक्षम स्थितीत नाही. एकीकडे सरकार ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारता’च्या गप्पा मारते, तर दुसरीकडे असे भरमसाठ कर आकारून निराशेचे वातावरण निर्माण करत असल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सने सांगितले.

* खासदार करणार पाठपुरावा

येत्या 29 नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या संसदीय अधिवेशनात यावर आवाज उठवत विरोध करणार आहे. याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री, अर्थमंत्री यांच्याशी शिष्टमंडळाशी चर्चा घडवून आणणार आहे. एकंदरीत जुना पाच टक्के कर कायम करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे शिवाचार्यरत्न खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सांगितले.

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

TAGGED: #centralgovernment #shakeup #Textileindustry #newyear #raising #GST #directly, #केंद्रसरकार #नव्यावर्षात #वस्त्रोद्योग #हादरा #जीएसटीत #वाढ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चिंचोळी पॉवरग्रेडजवळ दुचाकीच्या धडकेने आईसोबत थांबलेली ९ वर्षाची बालिका ठार
Next Article पतीने पत्नीला दिला ‘ताजमहाल’ गिफ्ट

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?