Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मशिदीवरील भोंग्यांना केले पुन्हा टार्गेट, सभेवेळी अजान सुरू, राज ठाकरे संतापले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

मशिदीवरील भोंग्यांना केले पुन्हा टार्गेट, सभेवेळी अजान सुरू, राज ठाकरे संतापले

Surajya Digital
Last updated: 2022/05/01 at 10:18 PM
Surajya Digital
Share
6 Min Read
SHARE

 

औरंगाबाद : औरंगाबादच्या आजच्या सभेत राज ठाकरेंची तोफ धडाडली. “1, 2, 3 तारखेला ईद आहे. त्यामुळे मला त्यांच्या सणात कोणत्याही प्रकारचे विष कालवायचे नाही. पण मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीत तर 4 तारखेपासून ऐकणार नाही. असा पुन्हा एकदा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. जिथे भोंगे वाजतील तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजलीच पाहिजे,” अशी विनंती राज ठाकरेंनी हिंदूंना केली आहे. Raj Thackeray gets angry again during the target meeting loudspeaker 

मशीदीवरील भोंग्यांना राज ठाकरे यांनी पुन्हा टार्गेट केलंय. आतापर्यंत सहन केलं. मात्र आता 3 तारखेनंतर सहन करणार नाही. ‘अभी नही तो कभी नही’ असं म्हणत राज ठारकरेंनी आवाहन केलं की, जर मशिदीवरील भोंगे काढले नाही, तर डबल आवाजात त्यासमोर आम्ही हनुमान चालिसा वाजवू. विनंती करुन समजत नसेल तर आमच्यासमोर पर्याय नाही असं राज ठाकरे यांनी परत एकदा ठणकावून सांगितले.

बाबासाहेब पुरंदरेंना शरद पवारांनी उतरत्या वयात त्रास दिला. फक्त ते ब्राम्हण आहेत म्हणून त्यांना त्रास दिला. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राज्यात जातीवाद सुरु झाला. जातीबद्दल आपुलकी प्रत्येकाला होती, मात्र दुसऱ्या जातीबद्दल द्वेष राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर निर्माण झाला. पवारांवर त्यांनी पुन्हा जातीय राजकारण पसरवल्याचा आरोप केला तर भोंग्यांना पुन्हा इशारा दिला.

आज तारीख 1, उद्या तारीख 2. 3 तारखेला ईद आहे. त्यांच्या सणात मला कोणत्याही प्रकारचं विष कालवायचं नाही. 4 तारखेपासून ऐकणार नाही, असा इशारा पुन्हा राज ठाकरेंनी दिला. तसेच हिंदूंना हातजोडून विनंती आहे. जिथे लाऊडस्पीकर लागतील त्यांच्यासमोर दुप्पट हनुमान चालिसा लागलीपाहिजे. विनंती करून ऐकत नसेल तर पर्याय नाही. लाऊडस्पीकर तुमच्या धर्मात बसत नाही. असेही राज ठाकरे म्हणाले. तसेच आम्हाला सभा घेतना हा सायलन्स झोन आहे. शाळा आहे. रात्री कुठे शाळा असेत. यांना कुठेही. रस्त्यावर उतरून नमाज पढताता. कुणी अधिकार दिला, असा सवालही त्यांनी केला आहे.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

मला कुठेही महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत. माझी इच्छाही नाही. मुस्लिम समाजानेही ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे. नाशिकला एक पत्रकार आले. मुस्लिम समाजातील होते. म्हणाले मी मुसलमान आहे. आम्हाला भोंग्याचा त्रास होतो. माझं लहान मुल लाऊडस्पीकरमुळे झोपेना. ते आजारी पडायला लागलं. झोप लागली तर अजान सुरू होते. मी मौलवींना सांगितलं मुलाला त्रास होतो. तुम्ही मशिदीतच्या आत करा. त्यानंतर त्याने आवाज कमी केल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

□ उत्तर प्रदेशात होऊ शकते महाराष्ट्रात का नाही ?

लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे. तो धार्मिक विषय नाही. त्याला धार्मिक वळण देणार असाल तर त्याचं उत्तर आम्हाला धर्माने द्यावं लागेल. एवढं लक्षात टेवााव. इच्छा नसताना टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. महाराष्ट्रातील शांतता बिघडवायची नाही. उत्तर प्रदेशात भोंगे उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही. सर्व लाऊडस्पीकर अनधिकृत आहेत. पोलिसांना विचारल्याशिवाय लाऊडस्पीकर लावू शकत नाही. कोर्टाने सांगितलं. किती मशिदींकडे परवानगी आहे. कुणाकडेच नाही. मला कोणी तरी सांगितलं.

□ सभेवेळी अजान सुरू, राज संतापले

सभेच्या वेळीच अजान सुरू झाली. त्याचा समाचार राज ठाकरेंनी घेतला आहे. सभेच्या वेळी बांग देत असतील तर त्यांच्या तोंडात आताच्या जाऊन हे पहिल्यांदा बंद करा. त्यांना जर सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊन जाऊ देत आता बोळा कोंबावा. अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही. संभाजी नगर पोलिसांना हात जोडून विनंती परत सांगतोय. एकत नसतील तर महाराष्ट्रातील मनगटात काय ताकद आहे हे दाखवू. देशवासियांना विनंती मागचा पुढचा विचार करू नका. भोंगे उतरलेच पाहिजे. सर्व धर्मीयांच्या स्थळांवरचे, पहिले मशिद नंतर मंदिरावरचे, अभी नही तो कभी नाही. हव तर पोलिसांची परवानगी घ्या लाऊडस्पीकरची घ्या. त्यांना द्यावीच लागते, परवानगी घेऊन लावा. सामाजिक दृष्ट्या प्रलंबित प्रश्न मार्गी लावा. हातभार लावाल,. ही विनंती करतो, असेही राज ठाकरे म्हणाले.

□ कोंबडे झाकायचं ठरवलं तर सुर्य उगवतोच; मविआ सरकारला राज ठाकरेंचा टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेसाठी पोलीस प्रशासनाची परवानगी मिळणार की नाही हे ठरत नव्हते. आता त्यावरून औरंगबादच्या सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. “कोंबडे झाकायचं ठरवलं तर सुर्य उगवतोच. या सभेसाठी आडकाठी आणून काहीच होणार नाही, “माझ्या सभांना कितीही अडवा पण मी बोलायचा थांबणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

□ राज ठाकरेंच्या सभेत कार्यकर्त्यांचा गोंधळ

 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेत पाण्याच्या बॉटल, माती भिरकावतात कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता, असे वृत्त समोर आले आहे. राज ठाकरेंनी भाषण थांबवून गोंधळ घालणाऱ्यांना सुनावले. ही मनसेची सभा आहे, बाहेरून येऊन इथं जर गडबड गोंधळ घातला तर चौरंग करून घरी पाठवेन, असा इशाराच राज ठाकरेंनी दिला.

□ शाहीर साबळेंवर बायोपीक येणार; राज ठाकरेंच्या हस्ते पोस्टरचे अनावरण

शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित लवकरच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘महाराष्ट्र शाहीर’ असे आहे. या चित्रपटाच्या पोस्टरचे औरंगाबादच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. शाहीर साबळे यांच्या भुमिकेत अभिनेता अंकुश चौधरी दिसणार आहे. यावेळी अभिनेते केदार शिंदे, अंकुश चौधरी उपस्थित होते.

 

You Might Also Like

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी

अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात

लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ

TAGGED: #RajThackeray #gets #angry #during #target #meeting, #मशिदी #भोंगे #टार्गेट #सभेवेळी #अजान #राजठाकरे #संतापले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article beaten by sand contractor सोलापुरातील वाळू ठेकेदाराकडून मोहोळमधील शेतक-याला मारहाण
Next Article भाजपच्या ‘बूस्टर डोस’ सभेत शिवसेनेवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?