Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आदर्श शाळा बांधकामासाठी 494 कोटींना मंजुरी; ठाकरे सरकारचा निर्णय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

आदर्श शाळा बांधकामासाठी 494 कोटींना मंजुरी; ठाकरे सरकारचा निर्णय

Surajya Digital
Last updated: 2021/09/01 at 7:58 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : राज्यातील सर्व मुलांना समान गुणवत्तापूर्ण सर्वोच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, त्यांच्यामध्ये 21 व्या शतकातील कौशल्ये विकसित व्हावीत तसेच पटसंख्या वाढावी या हेतूने राज्यातील शासकीय शाळांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत आदर्श शाळांची निर्मिती करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. सदर शाळांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीकोनातून आजच्या बैठकीत 488 शाळांसाठी 494 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.

राज्यातील सर्व मुलांना समान गुणवत्तापूर्ण सर्वोच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, त्यांच्यामध्ये 21 व्या शतकातील कौशल्ये विकसित व्हावीत, यासाठी ठाकरे सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पाठ्य पुस्तकाच्या बाहेर जावून ज्ञान घेणे, शिकविणे या दोन्ही क्रिया घडाव्यात, शिक्षणाच्या प्रती समाज सक्रीय व्हावा, सरकारी शाळांबद्दल पालकांचा विश्वास वाढावा यासाठी महत्वाची योजना जाहीर करण्यात आली आहे.

पटसंख्या वाढावी या हेतूने राज्यातील शासकीय शाळांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत आदर्श शाळांची निर्मिती करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सदर शाळांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीकोनातून आज राज्य मंत्रिमंडळामध्ये 5 मार्च 2021 च्या शासन निर्णयान्वये पहिल्या टप्प्यातील निवड करण्यात आलेल्या 488 शाळांसाठी 494 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आदर्श शाळांचे बांधकाम करण्यासाठी आवश्यक 100 कोटी इतका निधी ई गव्हर्नंसच्या निधीमधून सन 2020-21 या वर्षासाठी उपलब्ध नियतव्ययामधून पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.उर्वरित रुपये 394 कोटी इतका निधी विहित तरतुदीनुसार अर्थसंकल्पामधून किंवा पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर आदर्श शाळा विकसित करण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यात येणार आहे. तसेच सदर शाळांचे बांधकाम समग्र शिक्षा अभियानाच्या यंत्रणेमार्फत करण्यात येईल, अशी माहिती वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी आज दिली.

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी शासकीय शाळांचा चेहरामोहरा बदलण्याच्या उद्देशाने या आदर्श शाळा विकसित करण्यात येतील असे सांगितले. आदर्श शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या दृष्टीने सुसज्ज भौतिक सुविधांची उपलब्धी , वर्गखोल्या , संगणकीकरण , शाळा दुरुस्ती , शैक्षणिक साहित्य इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदर निधीचा विनियोग करण्यात येणार आहे. या शाळांचा विविध स्तरावर विकास केला जाणार आहे.

* या निकषांचा समावेश

राज्यातील बहुजनांच्या मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे. याचाच एक भाग म्हणून आदर्श शाळा योजनेअंतर्गत विशिष्ट निकषांच्या आधारे शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये वाढता लोक सहभाग, भविष्यात वाढती पटसंख्या व किमान 100, 150 पटसंख्या, शालेय प्रांगणात अंगणवाडी (पूर्व प्राथमिक वर्ग) उपलब्धी, आकर्षक शाळा इमारत, विद्यार्थीसंख्येनुसार वर्ग खोल्या, मुलां-मुलींकरीता आणि CWSN साठी स्वतंत्र व पुरेशी स्वच्छता गृहे, पेयजल सुविधा व हँड वॉश स्टेशन, मध्यान्ह भोजनाकरिता स्वयंपाकगृह व भांडार कक्ष, शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य, ग्रंथालय/वाचनालय, संगणक कक्ष, virtual class room ची सुविधा, विद्युतीकरण सुविधा, शाळेला संरक्षक भिंत, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून शाळेतील fire extinguisher सह energency exit ची उपलब्धता, परिसरातील शाळेमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्धता, इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा तयारी इत्यादी निकषांचा यामध्ये समावेश आहे.

You Might Also Like

शिवराज्याभिषेक दिन हा देशातील सर्वात मोठा उत्सव असावा – संभाजी भिडे

आश्रमशाळेतील पाण्याची टाकी कोसळली; १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, ४ जण गंभीर जखमी

१२ वर्षांच्या लढ्यानंतर सरोदे कुटुंबाला जमीन प्रकरणात न्याय

संभाजी ब्रिगेडने नाव बदलावे, अन्यथा उद्रेक अटळ – दीपक काटे

लाडकी बहीण योजनेतील ४८०० कोटींचा भ्रष्टाचार; एसआयटी चौकशीची सुप्रिया सुळे यांची मागणी

TAGGED: #494crore #sanctioned #construction #AdarshSchool #Thackeray #government's #decision, #आदर्शशाळा #बांधकामासाठी #494कोटींना #मंजुरी #ठाकरेसरकार #निर्णय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा पाऊस
Next Article सोन्याचा वडापाव; किंमत २००० रूपये

Latest News

शिवराज्याभिषेक दिन हा देशातील सर्वात मोठा उत्सव असावा – संभाजी भिडे
महाराष्ट्र July 30, 2025
जम्मू-काश्मीर : पूंछमध्ये चकमक, लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार
देश - विदेश July 30, 2025
आश्रमशाळेतील पाण्याची टाकी कोसळली; १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, ४ जण गंभीर जखमी
महाराष्ट्र July 30, 2025
सात्यकी सावरकरांवर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करा!
राजकारण July 30, 2025
१२ वर्षांच्या लढ्यानंतर सरोदे कुटुंबाला जमीन प्रकरणात न्याय
महाराष्ट्र July 30, 2025
संभाजी ब्रिगेडने नाव बदलावे, अन्यथा उद्रेक अटळ – दीपक काटे
महाराष्ट्र July 30, 2025
काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांचा भाजपमध्ये प्रवेश
राजकारण July 29, 2025
ऑपरेशन सिंदूर’मध्ये 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त; 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा – अमित शहा
देश - विदेश July 29, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?