Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Iftar_party Aurangabad राज ठाकरे यांना औरंगाबादमध्ये इफ्तार पार्टीचे आमंत्रण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

Iftar_party Aurangabad राज ठाकरे यांना औरंगाबादमध्ये इफ्तार पार्टीचे आमंत्रण

Surajya Digital
Last updated: 2022/04/29 at 11:13 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे ला औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. याच पार्श्वभुमीवर एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांना प्रसार माध्यमांद्वारे इफ्तार पार्टीचे आमंत्रण दिले आहे. “तुमची ही सभा रात्री 8 वाजता सुरु होईल, त्याआधी तुम्ही आमच्यासोबत इफ्तार करण्यासाठी यावं, सर्व हिंदू-मुस्लिम भाऊ एकसोबत बसून इफ्तार केल्यास समाजात एक चांगला संदेश जाईल.” असे जलील म्हणाले. Raj Thackeray invited to Iftar party in Aurangabad

आज औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जलील म्हणाले, दोन वर्ष कोरोनामुळे सणावर परिणाम झाला आहे. ९९ टक्के लोक शांतता प्रिय असतात. लहान-मोठे व्यापारी सर्व जातीधर्मातील लोक आहेत. त्यांना भीती आहे. सभेमुळे काही अनुचित प्रकार घडेल.  खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस सतर्क झाले आहेत.

इम्तियाज जलील यांनी इफ्तार पार्टीचे निमंत्रण देताना, “राज ठाकरे यांची औरंगाबादच्या मराठावाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा आहे. साडे सात वाजता तुमची सभा आहे, त्या सभेपूर्वी हिंदू मुस्लीम एकतेसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. हिंदू मुस्लीम एकत्र येऊन इफ्तार करु” असे आवाहन राज ठाकरे यांना केले आहे.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

पोलिस विभागाला विश्वास द्यायला आलो होतो की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मी खासदार म्हणून दिवाळीचा फराळ खायला जातो. मी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देतो, की त्यांनी ईदच्या दिवशी ईदग्याजवळ यावे आणि एकमेकांना शुभेच्छा द्यावेत, असे आवाहन त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना केले आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या अजेंड्यानुसार काम करतो. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की एकता शहरात टिकून राहावी. आम्ही धर्म व जातीविरोधात बोललो नाहीत. कायद्यापुढे कोणीही मोठे नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने जे निकाल (भोंग्यांबाबत) दिले आहे. त्याचे पालन करण्यासाठी एजन्सींची नियुक्त केली पाहिजे, असे ते म्हणाले.

“औरंगाबादच्या जनतेनं कोणतीही भीती बाळगू नये. एका राजकीय पक्षाचे नेते येत आहेत, त्यामुळं चिंता करु नका. बाजार पेठेतील दुकानदारांना त्यांच्या मालाचं काय होणार ही चिंता लागली आहे. राज ठाकरे हे आमचे पाहुणे आहेत. ते आम्ही दुश्मन नाहीत. त्यांनी यावं सोबत इफ्तार करावं आणि सभेत जाऊन त्यांना जे बोलायचं आहे ते बोलावं” असेही जलील यांनी म्हणले आहे.

“राज ठाकरे यांच्या सभेनंतर आणखी लोक येतील मात्र औरंगाबादमधील एकता आणि शांतता अबाधित राहावी. आमच्या सभेत आम्ही कोणत्याही धर्माविरोधात बोलणार नाही” असे आवाहन जलील यांनी जनतेला केले आहे. अद्याप जलील यांच्या निमंत्रणावर राज ठाकरे यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #RajThackeray #invited #Iftarparty #Aurangabad, #राजठाकरे #औरंगाबाद #इफ्तारपार्टी #आमंत्रण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Barshi ransom doctor डॉक्टराला मागितली 30 लाखांची खंडणी; बार्शीत दोघांविरोधात गुन्हा दाखल
Next Article inmates loan महाराष्ट्र पहिले राज्य; येरवडा कारागृहातील कैद्यांना मिळणार कर्ज

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?