सोलापूर, 16 एप्रिल (हिं.स.)।
सोलापूर शहराच्या विकास आरखड्या संदर्भात आज सुनावणीच्या पहिल्याच दिवशी तीनशे जणांनी तक्रारी नोंदवल्या. नेत्यांना, जनतेला विश्वासात न घेता विकास आराखडा लादलाय, अशी तक्रार यावेळी नोंदवण्यात आली.
प्राप्त हरकतीवर सुनावणी घेण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या चार जणांच्या समितीकडून सुनावणी सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी तीनशेच्या आसपास तक्रारी समिती सदस्यांनी जाणून घेतल्या. सर्व आरक्षण रद्द करा अशी सर्वच तक्रारदारांची प्राधान्याने मागणी असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले.
महापालिकेने हा विकास आरखडा तयार केला असून तत्कालीन आयुक्त शीतल तेली-उगले यांनी या आरखड्यास मान्यता देऊन सूचना आणि हरकती मागवल्या. या आराखड्यामध्ये 178.58 चौरस किलोमीटर क्षेत्राच्या 921 क्षेत्रावर आरक्षणात टाकण्यात आले आहे. या विकास आरखड्यास नागरिकांनी प्रचंड विरोध केला.