Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कथित सुपारी किलरचा घूमजाव, भीती दाखवत वक्तव्य करण्यास भाग पाडले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

कथित सुपारी किलरचा घूमजाव, भीती दाखवत वक्तव्य करण्यास भाग पाडले

Surajya Digital
Last updated: 2021/01/25 at 10:27 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : शेतकरी आणि सरकारमधली चर्चा पुन्हा अनिश्चिततेच्या वळणावर गेली. कारण सरकारनं दीड वर्षे कायदे स्थगित करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांना दिला होता. पण तोही फेटाळण्यात आला. अशा परिस्थितीत या नाट्यमय आरोपानं सरकार आणि शेतकऱ्यांमधलं वातावरण पुन्हा तापलं आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा एकिकडे निकाली निघत नसतानाच दर दिवसाआड केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये असणारा संघर्ष आणखी पेटताना दिसत आहे. त्यातच आता भर पडली आहे, ती म्हणजे एका सुपारी किलरच्या कबुलीची. शेतकरी आंदोलनात हिंसा घडवण्याच्या कामगिरीसाठी एका पोलिसानं आपल्याला पाठवलं होतं, अशी कथित कबुलीही त्यानं दिली होती. 26 जानेवारीला शेतकरी ट्रॅक्टर परेड करणार आहेत, त्यात गोंधळ घालण्यासाठी आणि मंचावरच्या 4 शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचाही कट असल्याचा खळबळजनक दावा तरुणानं माध्यमांसमोर केला होता, पण आता मात्र त्यानं यावर घुमजाव केला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अत्यंत खळबळजनक असे आरोप केल्यानंतर पोलिसांनी सदर प्रकरणाची चौकशी केली. याबाबत माहिती देताना सोनीपतचे एसपी जशनदीप सिंह रंधावा म्हणाले, या (कथिक सुपारी किलरनं) मुलानं म्हटलं होतं की राई पोलीस स्थानकातील पोसील इंन्स्पेक्टर प्रदीप, एसएचओकडून त्याला हे काम सोपवण्यात आलं होतं. ज्यानंतर प्राथमिक चौकशीत ही बाब सिद्ध झाली की प्रदीप नावाचे कोणीही इन्स्पेक्टर या पोलीस स्थानकात किंवा जिल्ह्यातही नाही आहेत’.

पुढं त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण सोनीपतचा रहिवासी असून, तो बेरोजगार आहे. चौकशीमध्ये ही बाबही समोर आली आहे की, छेडछाडीच्या आरोपांमुळं शेतकरी आंदोलनातील स्वयंसेवकांसोबत त्याचा वाद झाला होता. त्याला एका कॅम्पमध्ये नेऊन मारहाण करण्यात आली, ज्यानंतर त्याला भीती दाखवत अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यास भाग पाडलं.

दरम्यान, पोलिसांकडून तरुणाची चौकशी करण्यात आली. क्राइम ब्रांचकडूनही त्याची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथामिक माहितीनुसार हा तरुण 21 वर्षांचा आहे. जिथं आंदोलन सुरु आहे तिथून 50 किमी अंतरावरच्या सोनिपत गावचा रहिवाशी आहे. या तरुणाची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीय, त्याच्याकडून कुठली हत्यारंही पोलिसांना सापडलेली नाहीयत. त्यामुळे पोलीस सध्या तरी या षडयंत्राबद्दल काही पुरावे मिळालं नसल्याचं सांगतायत पण पुढची चौकशी सुरु आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #कथित #सुपारी #किलरचा #घूमजाव #भीती #दाखवत #वक्तव्यकरण्यास #भाग #पाडले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सीएमच्या परस्पर फाईलमधील मजकूर बदलला, खूपच गंभीर बाब
Next Article लातूरची लेक 26 जानेवारीला घडवणार इतिहास, 24 तास करणार लावणी नृत्य सादर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?