अमरावती, 23 मे (हिं.स.)
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. ज्या अभ्यासक्रमाकडे सर्व विद्याथ्यर्थ्यांचे व पालकांचे लक्ष लागून होते तो इयत्ता आठवी, दहावी व बारावीचा अभ्यासक्रम २०२८ २९ या शैक्षणिक वर्षापासून अर्थात चार वर्षांनी बदलणार आहे. नवीन शिक्षण धोरण अमलात आले तेव्हापासून अभ्यासक्रम हे निश्चित होते. शिक्षणा धोरणानुसार सीबीएसइ पॅटर्न प्रमाणे अभ्यासक्रम येणार याकडे सर्व पालक विद्याध्यांचे लक्ष लागून होते नव्या शिक्षण घोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्यामुळे अभ्यासक्रम कधी बदलणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दरम्यान शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्यातील कोणत्या इयत्तेचा अभ्यासक्रम कधी बदलणार हे स्पष्ट केले आहे.
राज्यात यावर्षीपासून म्हणजे शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू होत आहे. पहिल्याच वर्षी इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. २०२६ २७ या शैक्षणिक सत्रात इयत्ता दुसरी, इयत्ता तिसरी, चौथी व सहावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. तसेच २०२७-२८ या शैक्षणिक सत्रात इयत्ता पाचवी, सातवी, नववी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे दहावी, बारावीचे बोर्ड कायम राहणार का याबाबतही उत्सुकता शिगेला पोचली होती परंतु तूर्तास दहावी व बारावीचे बोर्ड कायम राहणार असल्याचे संकेत असून इयत्ता आठवी, दहावी व बारावीचा अभ्यासक्रम २०२८ २९ या शैक्षणिक सत्रात बदलणार आहे. याप्रमाणे राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार राज्य शैक्षणिक अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आलेला आहे. केंद्राच्या पॅटर्न नुसार पाठ्यपुस्तकाची मांडणी व रचना राहणार असून त्यामुळे विद्यार्थी विविध बोर्डाच्या पुर्वपरीक्षेची तयारी उत्तम करू शकतील.
गजानन मानकर कार्यगट सदस्य, म. रा. पाठयपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ, बालभारती, पुणे.