नाशिक, 1 मे (हिं.स.) – नासिक मधील काँग्रेस कमिटी मध्ये जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आलेकेंद्र सरकारने जात निहाय जनगणनेचा जो निर्णय घेतला हेच: संपूर्ण श्रेय काँग्रेस नेते विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना आहे. गेल्या काही वर्षापासून आमचे नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना व्हावी. या देशांमध्ये ज्यांची जेवढी संख्या तेवढी त्यांची भागीदारी ही संकल्पना घेऊन राहुल गांधींनी संसदेमध्येही आणि संसदेच्या बाहेर रस्त्यावरील लढाई लढली. देशातील वंचिता करता सुशितांकरिता राहुल गांधींनी हा लढा मोठ्या प्रमाणात लढला. जातनिहाय जनगणना ही संकल्पना राहुल गांधींची होती. या राहुल गांधींच्या लढ्याला यश आलं. म्हणून जातनिहाय जनगणण्याच्या निर्णयाची संपूर्ण श्रेय हे काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांना जाते असे मत नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी व्यक्त केले.
शहर काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष गौरव सोनार यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून अभिनंदन करून जल्लोष केला. राहुल गांधींच्या आदेशाप्रमाणे शहरातही वेळोवेळी या प्रश्नाकरता शहर काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने प्रयत्न केले असे यावेळी गौरव सोनार यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या लढ्यामुळे देशातील जनतेला एक विश्वास निर्माण झाला आहे मत गौरव सोनार यांनी व्यक्त केले. या प्रसंगी शाहू महाराज खैरे, केशव अण्णा पाटील, लक्ष्मण धोत्रे, संदीप शर्मा, मध्य नाशिक ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे, उद्धव पवार, अल्तमश शेख, तन्वीर तांबोळी, संतोष ठाकुर, ज्ञानेश्वर चव्हाण, अण्णा मोरे, अनिल बेग, राजकुमार जेफ, डी पी बोडके, अब्दुल बावा, जावेद इब्राहिम, भालचंद्र पाटील, सिद्धार्थ गांगुर्डे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.