Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नागपुरात घडलेली घटना ही पूर्वनियोजित कट – आ. प्रविण दरेकर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

नागपुरात घडलेली घटना ही पूर्वनियोजित कट – आ. प्रविण दरेकर

admin
Last updated: 2025/03/18 at 5:13 PM
admin
Share
2 Min Read
नागपुरात घडलेली घटना ही पूर्वनियोजित कट - आ. प्रविण दरेकर
SHARE

मुंबई, 18 मार्च (हिं.स.) : नागपूरच्या महाल भागात काल सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला. दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. हिंसक झालेल्या जमावाने रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी परीस्थिती हाताळत नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आणली खरी मात्र आज या हिंसाचाराचे पडसाद विधानपरिषदेत उमटले. भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी या घटनेचा निषेध करत ही घटना पूर्वनियोजित कट असल्याचा मोठा आरोप केला. तसेच या घटनेमागील मास्टरमाईंड शोधून काढून दंगेखोरांवर कठोरातील कठोर कारवाई करावी,

अशी मागणीही दरेकरांनी केली. सभागृहात बोलताना दरेकर म्हणाले कि, औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांची मजल किती वाढलीय हे कालच्या नागपुरातील घटनेने समोर आलीय. या घटनेच्या बाबतीत जी माहिती समोर आलीय ती सभागृहाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. शेकडो दुचाकी फोडल्या गेल्या, स्थानिकांच्या वाहनांना टार्गेट केले गेले. दुकानांत तोडफोड करण्यात आली. महाल परिसरातील जुन्या महाविद्यालयाच्या मागील भागात समाजकंटकांकडून तोडफोड करण्यात आली.

सायंकाळी ज्यावेळी दोन गटांत तणाव झाला तेव्हा सर्वात आधी जमावाने पोलिसांना टार्गेट केले. चिटणीस पार्क परिसरात पोलिसांनी समाज कंटकांची धरपकड सुरू केल्यानंतर लोकांनी दगड फेकले. त्यात काही पोलीस गंभीर जखमी झाले. घराजवळ न सापडणारे मोठेमोठे दगड, स्टाईलचे टोकदार तुकडे, लाकडी दांडे दिसून आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांवरही दंगलखोरांनी दगड व चाकू फेकून मारले तर काहींनी थेट तलवारी फेकून मारल्या. यात हे जवानही जखमी झाले. समाजकंटकांच्या या हल्ल्यात १५ हून अधिक पोलिस कर्मचारी, अधिकारी जखमी झालेत. पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जमावाने धारदार शस्त्राने हल्ला केला.

त्यात त्यांना गंभीर जखम झाली आहे. दरेकर पुढे म्हणाले कि, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. नागपुरात घडलेली ही घटना पूर्वनियोजित कट होता. वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरविण्यात आल्या. त्या कुणी पसरविल्या याचा शोध पोलिसांनी घ्यावा. बाहेरून लोकं आणून कट रचून घडविलेला हा प्रकार आहे. महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला. फडणवीस, शिंदे आणि पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात चांगले काम सुरू आहे. त्यामुळे राज्यात अस्थिरता निर्माण करायची, डोकी भडकावायची, कायदा सुव्यवस्था खराब करण्याचा काहींचा डाव आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोध करणाऱ्यांना औरंगजेबाचा एवढा पुळका का? या घटनेची चौकशी होऊन त्यामागील मास्टरमाईंड कोण हे शोधून काढले पाहिजे आणि दंगेखोरांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी असल्याचे दरेकर म्हणाले.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमेरिकेत विमान अपघातात संगीतकारासह ७ जणांचा मृत्यू, १० जणांना वाचवण्यात यश
Next Article कर्नाटक : सरकारी कंत्राटात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?