Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘त्या’ चिठ्ठीचा सुक्ष्म तपास, चिठ्ठीच ‘काळं-बेरं’ करणार उघड, पण प्रकरण कोणतं? डॉ.वळसंगकच ना ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

‘त्या’ चिठ्ठीचा सुक्ष्म तपास, चिठ्ठीच ‘काळं-बेरं’ करणार उघड, पण प्रकरण कोणतं? डॉ.वळसंगकच ना ?

admin
Last updated: 2025/04/27 at 2:20 PM
admin
Share
4 Min Read
SHARE

खास प्रतिनिधी
सोलापूर : बहुचर्चित डॉ. शिरीष वळसंगकरांच्या आत्महत्येच्या मुळाशी अद्याप खर्‍या अर्थाने तपास अधिकारी पोचू शकले नाहीत.आजवरच्या तपासातून डॉक्टरांच्या आत्महत्येबद्दल ठोस कारण पुढे आलेले नाही. दाखल गुन्ह्यावरुन संशयित मनिषा माने हिची पाच दिवस पोलिस कोठडी घेऊन माहिती मिळवली, पण तिच्याबद्दल ठोस पुरावा मिळाला नाही. त्यामुळे याप्रकरणात पोलिसांनी नवा ‘अ‍ॅक्शन’ मोड घेतला आहे. डॉक्टरांच्या आत्महत्येबद्दल गुप्त माहिती मिळवण्यासाठी काही खास माहितीगार म्हणजेच पंटर सोडले आहेत. डॉक्टरांचे नातेवाईक, अत्यंत निकटवर्तीय, शेजारी यांच्याकडून माहितीगार घटनेसंबंधी माहिती मिळवून ती पोलिसांना देणार आहेत. सोमवार ( ता.28 पासून ) तपासाला पुन्हा गती येणार आहे, तपास अधिकारी अजित लकडे दोन दिवस रजेवर गेल्याने या काळात तपास रखडला गेला.

विशेषत्वे, आत्महत्येच्या पार्श्‍वभूमीवर, डॉ. शिरीष वळसंगकरांच्या खिशात जी चिठ्ठी सापडली आहे, त्याच चिठ्ठीच्या संदर्भात सखोल तपास झाल्यास घटनेचे गूढ उकलेल, असा विश्‍वास खुद्द ‘खाकी’वर्दीलादेखील आता वाटू लागला असून त्यासाठी पोलिस अ‍ॅक्शन घेणार आहेत, डॉ. शिरीष वळसंगकर यांनी मराठी हस्ताक्षरात काही विशेष नोंदी केलेली कागदपत्रे पोलीस आवर्जून शोधणार आहेत. आढळून आलेली सुसाईड नोटही मराठी भाषेत लिहिलेली आहे. वास्तविक डॉ. वळसंगकर हे मराठी भाषेतून खूप कमी लिहायचे, त्याशिवाय ते आपली स्वाक्षरी इंग्रजी हस्ताक्षरात करायचे , त्यांच्या आजवर केलेल्या स्वाक्षरीत वडिल (पद्माकर) यांच्या नावाचा उल्लेख आवर्जून असायचा.

मात्र शवविच्छेदनावेळी डॉक्टरांच्या खिशात जी चिठ्ठी सापडेली आहे, ती संशय निर्माण करणारी असल्याचे पोलिसांना वाटत आहे, कारण चिठ्ठी मराठी भाषेत आहे आणि डॉक्टरांची स्वाक्षरी मराठीत आहे, याच मुद्यावर डॉ. वळसंगकरांनी मराठीतून लिहिलेली काही कागदपत्रे पोलिस नव्याने ताब्यात घेणार आहेत, मराठी हस्ताक्षर आणि स्वाक्षरीचा नमुना पडताळला जाणार आहेत, हीच चिठ्ठी तपाससाठी भारी ठरणार असल्याचे पोलिस सुत्रांचे म्हणणे आहे.

तीच खरखर कॅसेट, तेच अ‍ॅडव्हान्स बोलणे…
तपास अधिकार्‍याने मनीषाकडील माहितीचा सोडला नाद…
पाच दिवसाच्या पोलीस कोठडीदरम्यान संशयित मनीषा माने हिच्याकडून अपेक्षित माहिती मिळाली नाही, असे पोलिसांचे मत असल्याची माहिती पुढे आली आहे. काही वेगळी माहिती विचारली की, मनीषा जे जुनं या पूर्वीसांगितलं आहे, तेच सांगायची, अति अ‍ॅडव्हान्समध्ये बोलणारी मनीषा तपासादरम्यान खरखर कॅसेट वाटली. तिच्याकडून नवी कोणतीच माहिती मिळेना, तपासाचे धागेदोरे लागेनात हे लक्षात आल्यावर तपास अधिकार्‍याने तिच्याकडील माहितीचा नाद सोडला, तिची न्यायालयीन कोठडी घेतली. इतर माहितीच्या आधारे ते आता सोमवारपासून तपास करतील अशी माहिती समोर आली आहे.

डॉक्टरप्रेमींचे वर्तुळ ‘हा’ मुद्दा मान्य करायला नाही तयार
डॉ.वळसंगकरांच्या आत्महत्येच्या प्रकरणास आठ दिवस उलटून गेले. तरीपण पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागले नाही. डॉक्टरांच्या आत्महत्येबद्दल थेटच सांगू असे म्हणणारे पोलीस आता तोंड उघडायला तयार नाहीत. खास करुन गृहकलाचा डॉक्टरांच्या आत्महत्येशी काय संबंध लागतोय का? हा मुद्दा त्यांनी आजवर जाणीवपूर्वक बाजूला केला, तो कोर्टासमोरसुद्धा येऊ दिला नाही. मात्र पोलिसांच्या या भूमिकेवरच आता संशय निर्माण झाला आहे. जनतेच्या कोर्टात पोलीस आता आरोपीच्या पिंजर्‍यात आले आहेत. सोलापूर शहर-जिल्ह्यासह डॉ. वळसंगकर प्रेमींच्या वर्तुळात आत्महत्येबद्दल वेगळी ठोस चर्चा आहे, गृहकलह हाच आत्महत्येला जबाबदार आहे, तोच मुद्दा समाजमानात आहेत. समाजमनाच्या दबावामुळे पोलिसांना गृहकलाच्या मुद्याच्या आधारे तपास हा करावाच लागेल, कारण दबाव वाढत आहे. संशयित मनीषा माने हे डॉक्टरांची मारेकरी आहे, हे मान्य करायचला आजही डॉ.वळसंगकरप्रेमी तयार नाहीत.

‘यांच्या’तलं डॉक्टर प्रेम जागं झालं,
त्यांना न्याय मिळायलाच हवा ही भूमिका ठेवल्यास…
संशयित मनीषा माने हिच्याकडील माहितीशिवाय जे काही वेगळी माहिती समोर आली, त्याच धाग्यांचा आधार घेऊन डॉ.वळसंगकरांचे अत्यं त जवळचे नातेवाईक, घराशेजारील लोक, नेहमीच्या बैंठकीमधील मित्र मंडळी या सर्वांकडून अत्यंत गुप्त पद्धतीने माहिती घेतली जाणार आहे. डॉक्टरांबद्दलचं संबंधितांच्या मनामधील प्रेम जागे झाले, निरापराध देवमाणसाला आयुष्य कायमचे संपवावे लागले, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, जाणीपूर्वक केलेल्या चुकीला माफी नाही, दोषींना कठोर शिक्षा व्हायलाच हवी, अशी भूमिका घेऊन संबंधितांना माहिती दिल्यास डॉक्टरांच्या आत्महत्येच्या मुळाशी पोलिसांना पोचता येईल, हे नक्की.

You Might Also Like

डॉ. वळसंगकर प्रकरण : २५ दिवस लोटले तरी पोलिसांच्या हाती काहीच नाही

सोलापुरात आतापासूनच बेरजेचे राजकारण सुरू

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ संपविण्यासाठीच खासदार झाले – प्रणिती शिंदे

सोलापूरात गुटखा मिळतोय सर्रास दुकाने-टपर्‍यांवर

भारतीय सैन्यदलापुढे पाकला गुडघे टेकावे लागले – प्रणिती शिंदे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन
Next Article कोण घेणार अंगावर गुलाल? मतदारराजाचा कौल आज होणार मतपेटीत बंद

Latest News

रवींद्र जाडेजा आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिला खेळाडू
देश - विदेश May 14, 2025
महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर
महाराष्ट्र May 14, 2025
ऑस्कर विजेते हॉलीवूड दिग्दर्शक रॉबर्ट बेंटन यांचे निधन
देश - विदेश May 14, 2025
रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यास पकडले, खासगी एजंटही जाळ्यात
महाराष्ट्र May 14, 2025
राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत
राजकारण May 14, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्र May 14, 2025
सातार्‍यात ‘टेस्ला’चे युनिट येणार; जिल्ह्याच्या विकासाला चालना
महाराष्ट्र May 14, 2025
पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून मालेगावचा तरुण ताब्यात
महाराष्ट्र May 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?