Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश

admin
Last updated: 2025/06/18 at 8:33 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नाशिक, 18 जून (हिं.स.)।

– राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून द्वारका ते नाशिकरोड डबलडेकर उड्डाणपुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून, या उड्डाणपुलावर मेट्रो चालविण्यासंदर्भात ना हरकत दाखला देण्याची तयारी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर यांनी दर्शविल्याची माहिती नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिली आहे. यासंदर्भात सोमवारी 23 रोजी नाशिकमध्ये महामेट्रोच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक होत आहे. नाशिकसाठी प्रस्तावित असलेली मेट्रो ‘आर्टिक्युलेटेड बस मेट्रो असेलअशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

द्वारका ते नाशिकरोडउड्डाणपुलाचे रखडलेले काम महामेट्रो आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यामधील समन्वयातून मार्गी लावण्यासाठी खा. वाजे यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक हर्डीकर यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासूचनेनुसारडबलडेकर उड्डाणपुलाची उभारणी करताना महामेट्रोची ना हरकत मिळविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली, हर्डीकर यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जर उड्डाणपूल करत असेल, तर महा मेट्रोसाठी जागा राखीव ठेवण्याचीविनंती महामेट्रोच्या वतीने केली जाईल, असे यावेळी हर्डीकर यांनी सांगितले. नाशिकसाठी प्रस्तावित असलेली मेट्रो ही वेगळ्या प्रकारची आधुनिक प्रणाली असणार आहे, जी थेट रस्त्यावर चालणारी ‘आर्टिक्युलेटेड बस मेट्रो’ असेल, अशीही माहिती यावेळी त्यांनी दिली.

डबलडेकर उड्डाणपूल, मेट्रोसाठी वस्तुनिष्ठ पाठपुरावा करून हे प्रकल्प कसे लवकर मंजूर होतील, त्यांना निधी उपलब्ध होईल आणि खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात होईल, यासाठी युद्ध पातळीवर पाठपुरावा केला जात आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनीदेखील मागील तीन बैठकांमध्ये नाशिकरोड ते द्वारका उड्डाणपुलाबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.

राजाभाऊ वाजे, खासदार

You Might Also Like

वारकरी भक्तीयोग’कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा – चंद्रकांतदादा पाटील

विद्यार्थ्यांनी आवडीच्या विषयामध्ये करिअर करावे- आ. संग्राम जगताप

तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्याबाबत शासन सकारात्मक – संजय शिरसाट

समृद्धी महामार्गावर भरधाव कार ट्रकला धडकली; चालकाचा जागीच मृत्यू

सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीत वाढ

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
Next Article अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
सांगलीच्या जयश्री पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भाजपा प्रवेश
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?