खास प्रतिनिधी
सोलापूर : स्थळ : नेहमी मोठी गजबज असलेला सोलापुरातील किडवाई चौक परिसर…वेळ : बुधवार (ता.9) दुपारी दोन वाजण्याची…उन्हाचा पारा चढलेला असला तरी रस्त्यावरुन ये-जा करणार्यांची मोठी वर्दळ…या गर्दीच्या ठिकाणी चौघेजण कैद्याच्या गणवेशात नळाचे खोदकाम करताना दिसत असलेले…या कैद्यांच्या शेजारी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उभे ठाकलेले…टिकाव, खोर्या, टोपली या साधनांच्या आधारे कैदी खड्ड्याचे काम करीत असलेले…यापूर्वी कधीही न पाहिलेले हे दृष्य पाहून या ठिकाणी प्रत्येक ये-जा करणारा थबकलेला…प्रत्यक्ष आपण नेमकं काय बघतोय? यावर विश्वासदेखील बसत नसलेला…कैदांना पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झालेला…थोडसं बाजूला जाऊन प्रत्येकाची कुजबुज चाललेली…काहीजणांकडून मोबाईलच्या कॅमेर्यांचे फ्लॅश त्या धक्कादायक प्रकारावर पडत असलेले…
मीडियाचे कॅमेरदेखील चित्रीकरणाची पुढे सरसावलेले…चक्क कैद्यांना रस्त्यावर आणणण्याच्या धाडसाचे व्हिडीओ कैकांना तातडीने शेर झालेले…तद्नंतर सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चर्चेचं वादळ उठलेलं…कुतुहलानं प्रत्येकजण आपापपल्या परीनं कैद्यासंबंधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असलेला…रात्री उशिरापर्यंत जिल्हा कारागृह प्रशासनाच्या ‘अजब कारभाराची गजब गोष्ट’ गुन्हेगारी, पोलीस, राजकीय आदी सर्वच क्षेत्रांच्या वर्तुळात रंगलेली… सोलापुरातील किडवाई चौक पसिरातील जिल्हा कारागृहात 550 कैदी आहेत. त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी महापालिकेकडून उपलब्ध होत नाही. शिवाय पुरवठा होणारे पाणी दुषित आहे. स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठ्याअभावी तुरुंगातील कैद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, नव्याने नळ जोडणी घेण्यासाठी कैदी बाहेर काढले होते.
त्यातून शहर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणाला मोठे वेगळे वळण लागले. महापालिकेच्या आरोग्य अभियंता यांनी खुलासा केला आहे. जेल मध्ये पाणी साठवण क्षमता कमी आहे.नव्याने टाकी बनवल्यास नवीन लाईन देता येईल.तसे जेल प्रशासनास आधीच कळविले आहे.
दरम्यान कैद्यांकडून सुरु असलेले खोदकाम अर्ध्यावरच ठेवण्यात आले. नळजोडणी झाली नसल्याचे तुरुंग अधीक्षकांकडून सांगण्यात आले.
तुरुंग अधीक्षक कुंभार यांचे मुद्दे :
: तुरुंगातील 550 कैद्यांना दुषित पाण्यातून मोठा धोका निर्माण झाला,
त्यामुळे कैद्यांच्या आरोग्याचा विचार करता नवीन नळाची गरज
: नळ खोदकामासाठी काढलेले कैदी हे रेग्यूलचे होते, चांगल्या चारित्र्याचे होते, पळून जाणार्यांपैकी नव्हते.
: नळजोडणीसंबंधी खोदकामाची जबाबदारी तुरुंग प्रशासनानेच घ्यावी, असे महापालिकेने सांगितल्याने खोदकामासाठी कैदी काढले बाहेर
: तुरुंगामध्ये कैद्यांशिवाय अन्य कर्मचारी कामांसाठी नाहीत, त्यामुळे कैद्यांकडून काम करुन घेणेच क्रमप्राप्त होते
: कैदी बाहेर काढणे ही तुरुंगासंबंधीची रेग्यूलर बाब आहे, त्यामुळे वेगळे वाटण्याचे कारण नाही
: तुरुंगामधील स्वच्छतेसह अन्य कामे हे कैदीच करता, इतर कर्मचारी नियुक्त नाहीतच
: तुरुंग परिसरातील स्वच्छेतसाठी दररोज कैदी बाहेर काढले जातात, नळजोडणीचे काम तुरूंगाजवळच होते म्हणून कैद्यांना नेले
: कैद्यांना बाहेर काढण्याची सगळी रितसर प्रक्रिया पूर्ण केली होती
: काम करण्यास इच्छुक असल्याचा कैद्यांचा विनंती अर्ज प्रशासनाकडे आहे
: नळजोडणीच्या खोदकामाचे साधारण 65 ते 67 रुपये वेतन कैद्यांना देण्यात येईल
: कुख्यात कैदी अशा कामांसाठी बाहेर काढून धोका पत्करला जात नाही
: खोदकाम करताना महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते
: 550 कैद्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गहन बनल्याने, शिवाय नळ जोडणीसाठी दुसरा पर्यायाच नसल्याने कैद्यांना काढले बाहेर
: नळ जोडणी शुल्क महापालिकेकडे भरले आहे
: मा.न्यायलयाकडे पाण्यासंबंधी तक्रारी झाल्यात आहेत, न्यायालयाने पाणीपुरवठ्याची सोय करण्याचे निर्देश दिलेत
: महापालिका आयुक्तांची नोटीस मिळाली
समक्ष भेटण्यासह लेखी उत्तर देणार येईल
चौकट
महापालिका आयुक्तांच्या कारणे दाखवा नोटिसमधील मुद्दे
– महापालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी नळ खोदाई ठिकाणी अ
प्रत्यक्ष नसताना अनधिकृतपणे नळी जोडणी घेण्याचा प्रकार
: नळ जोडणीसंबंधी महापालिकेच्या संबंधित विभागास
माहिती न देता परस्पर खोदाई
: जिल्हा कारागृह प्रशासनाने नळ जोडणीचे
महापालिकेला अद्याप नाही भरले शुल्क
: कारागृह अधिकारी येवून भेटले होते,
पण शुल्क न भरताच निघून गेले
:शुल्क न भरता पाणीपुरवठ्यासाठी
दोन इंची लाईन देण्याची केली होती मागणी
चौकट
खोदकामासाठी काढलेले कैदी हे रेग्यूलचे आणि प्रामाणिक
नळजोडणीच्या कामासाठी बाहेर काढलेले चौघे कैदी हे गंभीर गुन्ह्यामधील नव्हतेच. शिवाय शिक्षा लागलेले कैदी नव्हते, रेग्यूलर कैदी होती. परिस्थिती गरीब असल्याने कामाची गरज असलेले आणि त्यासाठी तुरुंग प्रशासनाकडे विनंती केलेले ते होते. तुरुंगात प्रामाणिकपणे काम करणारे उत्तम चारित्र्याचे संबंधित कैदी होते, त्यामुळे ते पळून जाण्याची कसलीच रिस्क नव्हती, असे जिल्हा कारागृह प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले.
::::::::::::::::::::::::::