Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काहीही करा ‘ही’ बाजार समिती ताब्यात घ्या, कोणी, कोणाला सोडले फर्मान ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top Newsसोलापूर

काहीही करा ‘ही’ बाजार समिती ताब्यात घ्या, कोणी, कोणाला सोडले फर्मान ?

admin
Last updated: 2025/03/27 at 11:53 AM
admin
Share
4 Min Read
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
SHARE

प्रतिनिधी:
सोलापूर
सोलापूर बाजार समिती निवडणुकीची प्रकिया सुरू झाली आहे. ही समिती ताब्यात घेण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणूक लढवा, तडजोडी करा, काहीही करा मात्र बाजार समिती ताब्यात घ्या असे आदेश पक्षश्रेष्ठींनी भाजपच्या तीन आमदारांना दिले आहेत. आ. सचिन कल्याणशेट्टी यांना या निवडणुकीचे सर्वाधिकार देण्यात आले आहे. त्यामुळे आता आ. कल्याणशेट्टी कोणतही रणनीती आखतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यंदाची बाजार समितीची निवडणुकीसाठी संचालक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, व्यापारी व हमाल,तोलार असे मतदार आहेत. त्यामुळे आ. विजय देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे आ. सुभाष देशमुख हेही आपल्या कार्यकर्त्यांना काही तडजोडी कराव्या लागतील, नवीन लोकांबरोबर जावे लागेल, असे सांगत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काही तरी वेगळे राजकारण घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपकडून आ.सचिन कल्याणशेट्टी यांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत. दुसरीकडे सुरेश हसापुरे यांनीही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय जवळपास घेतला आहे. त्यामुळे हसापुरे यांना घेत आ. कल्याणशेट्टी मोर्चेबांधणी करत आहेत.

उत्तर सोलापुरातील बहुतांश सोसायटीवर दिलीप माने यांचे एकमुखी वर्चस्व आहे. उत्तर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती माने यांच्याकडे आहेत. याशिवाय पाठोपाठ बळीराम साठे यांचेही तालुक्यात वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांचीही भूमिका महत्वाची आहे. दक्षिण सोलापूरमधील सोसायटीवर सुरेश हसापुरे यांचे वर्चस्व आहे. स्वामी समर्थ सूतगिरचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, सोलापूर बाजार समितीचे माजी संचालक आप्पासाहेब पाटील-वडकबाळकर यांच्याकडेही काही सोसायट्या आहेत. या सर्वांच्या भूमिकाही महत्वाच्या ठरणार आहेत.

सोलापूर बाजार समिती महत्वाच्या समितीपैकी एक मानले जाते. त्यामुळेच भाजपला ही समिती स्वतःकडे ठेवायची आहे. तसे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. त्यामुळे आ. कल्याणशेट्टी आणि आ.सुभाष देशमुख, आ. विजय देशमुख हे गतवेळी असलेल्या काही संचालकांना घेत भाजपाचे तगडे पॅनेल उभे करतील, असे बोलले जात आहे.

दुसरीकडे माजी आ. दिलीप माने यांनीही आपले पत्ते ओपन केले नाहीत. त्यांनी दक्षिण आणि उत्तरमधील कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे. ते भाजपसोबत जाणार का, गेले तर जागा वाटप कसे आणि कोणाच्या म्हणण्यानुसार होणार की दिलीप माने स्वतःचे पॅनेल उभे करणार याकडे दक्षिण आणि उत्तर तालुक्याचे लक्ष लागले आहे. माने यांच्याबरोबर वाट्याघाट्या न झाल्यास त्यांच्या विरोधात पॅनेल उभे करण्याची तयारीही भाजपाने सुरू केली आहे.

भाजपकडून बिनविरोधची चाचपणी
आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडून बाजार समिती निवडणूक बिनविरोध करण्याची चाचपणी सुरू आहे. दिलीप माने यांना सोबत घेण्याचे ठरल्यास भाजपच 4 ते 5 जागा घेण्याची शक्यता आहे तर हसापुरे यांना दोन जागा सोडण्यात येतील, सध्या सुरू आहे. उर्वरित जागा माने यांच्याकडे जातील, अशी चर्चा आहे.

सोलापूर बाजार समिती निवडणूक
194 अर्ज विक्री; दिलीप माने यांनीही भरला अर्ज

सोलापूर/प्रतिनिधी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकमध्ये दक्षिण व उत्तर मधील मातब्बर नेते माजी आमदार दिलीप माने, पृथ्वीराज माने, बाळासाहेब शेळके, अविनाश मार्तंडे, ज्योती मार्तंडे, राजू सुपाते यांच्यासह इतर 47 नेत्यांनी बुधवारी नामनिर्देशन सादर केले आहे. बुधवार दुसर्‍या दिवशी 194 अर्ज विक्री झाल्याचे उप निबंधक कार्यालयाच्या वतीने सांगितले.

बुधवारी दुसर्‍या दिवशी सहकारी संस्थांमधून 26 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत यामध्ये माजी चेअरमन दिलीप माने, पृथ्वीराज माने, बाळासाहेब शेळके, अविनाश मार्तंडे, राजू सुपाते, बाळासाहेब पाटील, केदारनाथ विभूते, धनेश आचालरे, गुरुनाथ पाटील. इतर महिला राखीव मधून ज्योती मार्तंडे, अनिता विभूते, मागासवर्गीय-धनेश आचालरे, अविनाश मार्तंडे,श्रीशैल पाटील, विमुक्त /भटक्या जाती मधून- बाळासाहेब पाटील, सतबूर गिनेनी, ग्रामपंचायतमधून 9 नामनिर्देशन सादर केले आहेत. व्यापारी मधून-9 तर हमाल व तोलार मधून 5 उमेदवारी अर्ज सादर झाले आहे. शुक्रवारी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे.

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

पुणे – पालिकेच्या पाणी मीटर मोहिमेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article He died tragically by drowning in a well. बाॅल झेलता झेलता थेट विहिरीत गेला, पुढं घडलं ते लय वाईट!
Next Article उजनीच्या आंदोलनाचं पाणी उफाळले, ‘हे’ देणार धरणग्रस्तांसाठी व्यापक लढा

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?