नाशिक, 10 जुलै, (हिं.स.)। पावसाळ्याच्या दिवसांत साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढली असून जिल्ह्यातील २८७ जणांना डेग्युचा आजार झाल्याची बाब समोर आली आहे. मागील पाच महिन्यांचा विचार करता जून महिन्यात ५३ डेंग्युच्या रुग्ण आढळले आहेत. तर जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यात २३४ या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात जानेवारी ते जून या कालावधीत २ हजार ९२१ जणांची रक्तजल नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात २८७ रुग्ण डेंग्यू बाधित आढळून आल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुनिता पिवळतकर यांनी दिली.
तसेच डेंग्यूच्या नियंत्रणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत प्रसिद्धी व जनजागरण मोहीम राबविणे सातत्याने सुरु आहे. आरोग्य विभागातर्फे विविध शासकीय व खाजगी संस्थाना या आजाराच्या खबरदारीबरोबरच संशयित रुग्ण आढळल्यास त्वरित कळविण्याचे पत्र देण्यात आले आहे. तसेच संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीला पाठवून रुग्ण आढळल्यास त्वरित औषधोपचार केले जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.ताप आल्यास त्वरित जवळच्या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविणे, रक्तजल नमुन्याची तपासणी करून खात्री करणे, आवश्यक ठिकाणी धूर फवारणी, डास उत्पत्ती स्थाने नष्ट करणे, पाण्याची डबकी बुजविणे, साचलेल्या पाण्यात डास अळी भक्षक गप्पी मासे सोडणे, निरुपयोगी टायर, मोकळे डबे, नारळाच्या करवंटी, पाण्याच्या बाटल्यांची विल्हेवाट लावणे, एडीस डास दिवसा चावत असल्याने लहान मुलांना मच्छरदाणीत झोपविणे हे उपाय करणे गरजेचे आहे.
ही आहेत लक्षणे(चौकट)
एकाएकी तीव्र ताप व डोकेदुखी, स्नायू व सांधेदुखी, उलट्या होणे, तीव्र डोळेदुखी, अशक्तपणा येणे, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, ताप कमी जास्त होणे, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली व नाकातून रक्तस्त्राव होणे, रक्ताची उलटी होणे, रक्त मिश्रित किंवा काळसर रंगाची सौचास होणे, पोट दुखण्यासारखी लक्षणे डेंग्यु झालेल्या रुग्णामध्ये आढळून येतात.
यंत्रणेला सहकार्य करावे
डेंग्यू आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी सक्रीय सहभाग घेऊन आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे. तसेच या आजाराची लक्षणे दिसताच त्वरित तपासणी करुन उपचार घेण्यात याने.
डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद
विविध विभागांमार्फत जनजागृतीच
दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे या आजाराच्या बचावासाठी आरोग्य प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा हिवताप