नवी दिल्ली, 14 जुलै (हिं.स.) :
एअर
इंडियाचे विमान एआय १७१ च्या अपघाताने संपूर्ण देशाला धक्का बसला होता. आता या अपघाताच्या
प्राथमिक चौकशी अहवालावरएअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी प्रतिक्रिया
दिली आहे की, विमानात कोणताही यांत्रिक किंवा देखभाली संदर्भातील दोष नव्हता. त्यांनी
आपल्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात हे स्पष्ट केले आहे. आणि अपघाताबद्दल
घाईघाईने निष्कर्ष काढू नका असा सल्लाही दिला आहे.
अपघातानंतरखबरदारीचा उपाय म्हणूनडीजीसीएच्या देखरेखीखाली एअर
इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी काही दिवसांत
पूर्ण झाली आणि सर्व विमाने उड्डाणासाठी पूर्णपणे योग्य असल्याचे आढळून आले आहे. आम्ही
सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण केल्या आहेत आणि भविष्यात जर काही नवीन तपासण्या
सुचवल्या गेल्या तर आम्ही त्याही पूर्ण करू. त्याचप्रमाणे त्यांनी कर्मचाऱ्यांना
या अपघातावर घाईघाईने निष्कर्ष काढू नयेत असे आवाहन केले. तपास अजूनही सुरू आहे
आणि संपूर्ण चित्र समोर येण्यासाठी वेळ लागणार असल्याचं कॅम्पबेल यांनी म्हटलं आहे.
कंपनी
तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचं विल्सन कॅम्पबेल यांनी स्पष्ट केलं आहे.
अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी प्रत्येक पैलूची सखोल चौकशी केली जात आहे.
एएआयबीचा अंतिम अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे.त्यात अपघाताचे खरे कारण स्पष्ट होईल. दरम्यान, एअर
इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल यांचे हे विधान केवळ
कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर या अपघाताचे सत्य जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी
महत्त्वाचे आहे. देशाच्या नजरा आता चौकशीच्या अंतिम अहवालावर आहेत.