पुणे, 5 जुलै (हिं.स.)। महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर घटनांमध्ये ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ (मकोका) लावण्याचा विचार सुरू आहे. याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून, कायदेशीर बाबी तपासण्याच्या सूचना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित ‘गुरुजन गौरव’ समारंभात अजित पवार यांच्या हस्ते उद्योजक अरुण फिरोदीया, ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर आणि ज्येष्ठ नृत्यांगना शमाताई भाटे यांना गौरवण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर माजी महापौर अंकुश काकडे, दीपक मानकर, आयोजक अप्पा रेणुसे, विजय जगताप, अभय मांढरे, मोनिका मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते. वार म्हणाले, महिलांच्या सुरक्षेबाबत कायदा आणि सुव्यवस्था चोख असावी, यासाठी वेळोवेळी कायदे करण्यात आले आहेत. अशा प्रकरणांवर कठोर भूमिका घेण्याचा शासनाचा प्रयत्न असतो.”कोंढवा सारखी प्रकरणं पुढे आल्यानंतर समजतं की वस्तुस्थिती काहीशी वेगळी होती.
काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अत्यंत नीच वर्तन करतात, त्यामुळे समाजात अस्वस्थता निर्माण होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पवार म्हणाले, माणसाचे वय कितीही झाले तरी शेवटपर्यंत शिकण्याची गरज असते. ‘आपण सगळं काही जाणतो’ असं समजण्याचं कारण नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते.