धनगर समाजाच्या न्याय हक्कांसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत मुंबई महत्वपूर्ण बैठक!
प्रतिनिधी
मुंबई :
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्यालय टिळक भवन मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत धनगर समाजाच्या हक्क, आरक्षण आणि विकासाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
यावेळी बैठकीत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, धनगर समाजाच्या मागण्यांसाठी काँग्रेस पक्ष पूर्णपणे कटिबद्ध आहे. धनगर समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करू, धनगर समाजाच्या सन्मानासाठी आणि हक्कांसाठी लढा सुरूच राहील.
या बैठकीस राम मोघे, चेतन भाऊ नरोटे, रामहरी रुपनर, आदित्य फत्तेपूरकर, बाळासाहेब शेळके, अमित कारंडे, राजाभाऊ रूपनवर, यशपाल भिंगे, सचिन नाईक, राम बुरुंगले, आकाश मोरे, साहेबराव देवकते, प्रकाश पाटील शिंदे, अजिंक्य मासाळ, राहुल सोनाळे, नरेंद्र कुनगर, कुणाल जानकर, प्रकाश सोनवणे, विरधवल गाडे, राज श्रीरामे, सोपान देवकते, हुल्लाप्पा नाईक, गोविंद गोरे, संदीप पाटील, नंदेश पिंगळे, छगन पाटील, धनाजी धायगुडे, उज्वल नाटकर, शिवाजी देवकते, राजाराम काळे, अमोल देवकते, अमर इंगळे, अमोल काळे, शंकर धुते, सुधाकर यादगिरे, साहेबराव मस्के, वैभव बीरकर, यांच्यासह राज्यभरातील धनगर समाजातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.