□ गणेश वानकरसह नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर : युवा सेनेच्या मेळाव्यात माजी शिवसेना जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांच्यावर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी नगरसेवक गणेश वानकर यांच्यासह नऊ जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास हतात्मा स्मृती मंदिर येथे झाली.
श्रीकांत राजाराम भोईटे, उमेश ताकमोगे, संदीप हंचाटे, शहाजी भोसले, गणेश वानकर व अन्य दोन ते तीन जण (सर्व रा. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ठोंगे पाटील यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. भादंवि कलम ३२३, १४३, १४७, १४८ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर करीत आहेत.
युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थित झालेल्या मेळाव्यास आलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांना खुद्द शिवसैनिकांकडूनच मारहाण करण्यात आली आहे. या भांडणानंतर हुतात्मा स्मृती मंदिर परिसरात मोठ्या प्रमाण पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. याप्रकरणी लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी गणेश वानकर यांच्यासह चार ते पाच जणांविरोधात फिर्याद दिली आहे.
वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत सोलापुरात हुतात्मा स्मृती मंदिरात सोमवारी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यासाठी युवा सेनेच्या कार्यकर्त्याबरोबरच शिवसैनिकांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मेळाव्यासाठी माजी जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील हुतात्मा स्मृती मंदिर येथे आले होते.
Crimes filed against nine persons including Ganesh Wankar; Thonge-Patil said he would not tolerate bullying, while Wankar said he did not know
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
त्यावेळी पार्किंगच्या कारणावरून त्यांना शिवसैनिकांनी मारहाण केली. या मारहाणीच्या घटनेमुळे शिवसेनेतील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना मारहाणीची माहिती मिळताच हा वाद सदर बजार पोलिसांपर्यंत गेला. याप्रकरणी वाद वाढू नये म्हणून शिवसेनेचे सर्व नेते पोलीस ठाण्यात गेले. ठोंगे पाटील यांची सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, त्यांचे मेळाव्याला येण्याचे कारणच काय, असे शिवसैनिकांनी बोलताना सांगितले.
या मारहाणीबद्दल पोलिसांनी सांगितले की, हुतात्मा स्मृती मंदिरासमोर वरुण सरदेसाई यांच्या वाहनासह इतर वाहनांचा ताफा आल्यानंतर कोणाची गाडी पुढे व कोणाची मागे यावरून कार्यकर्त्यांमध्ये बाचाबची झाली. यातूनच तीन-चार तरुणांनी लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील सभागृहात येत असताना मारहाण केली. याप्रकरणी गणेश वानकर, श्रीकांत भोईटे, संदिप हंचाटे, उमेश ताकमोंगे यांच्यासह ७ ते ८ जणांवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
□ गुंडगिरी खपवून घेणार नाही : ठोंगे-पाटील
यापुढे वानकर आणि त्यांच्या समर्थकांची गुंडगिरी खपवून घेणार नाही. ही लढाई आपण कायदेशीर मार्गाने लढणार आहे. पार्किंगच्या कारणावरून आपल्याला मारहाण करण्यात आली. झालेला प्रकार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत आपण पोहचवणार असल्याचे ठोंगे-पाटील यांनी सांगितले.
□ झालेला प्रकार मला माहीत नाही : वानकर
झालेला प्रकार आपल्याला माहिती नाही. मी संपूर्ण कार्यक्रमात वरुण देसाईंसोबत होतो. याला शेकडोजण साक्षी आहेत. सर्वांचे कॅमरेही होते, त्याद्वारेही हे सिध्द होते. चौकशीमधून सर्व सत्य बाहेर होईल, असे गणेश वानकर म्हणाले.