नवी दिल्ली , 22 एप्रिल (हिं.स.)।ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी(दि.२१) निधन झाले.यानंतर जगभरात शोककळा पसरली.आता पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर भारत सरकारने तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला आहे. यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने आदेश जारी केले आहेत.
गृह मंत्रालयाने पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल आदर म्हणून तीन दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर केला आहे. पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी(दि.२१) सकाळी निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ, संपूर्ण भारतात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा पाळला जाईल. या कालावधीत, मंगळवार, २२ एप्रिल आणि बुधवार, २३ एप्रिल असे दोन दिवस राज्य शोक पाळला जाईल.
पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी राज्य शोकचा एक अतिरिक्त दिवस देखील असेल. राष्ट्रीय शोक काळात, भारतातील सर्व इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल जिथे नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो. याशिवाय कोणताही अधिकृत मनोरंजन कार्यक्रम होणार नाही.