Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गजबजलेल्या आसरा चौकात भाच्याने मामाचा गळा चिरला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

गजबजलेल्या आसरा चौकात भाच्याने मामाचा गळा चिरला

Surajya Digital
Last updated: 2023/04/07 at 11:54 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

○ तो मला मारायला आला होता; मी त्यालाच मारले

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● असा झाला खून● मृतासोबतच आरोपी गेला सिव्हिल हॉस्पिटलला● अजित होता फुल्ल नशेत● दोघांच्याही खिशात सापडला गांजा

 

सोलापूर : चेहऱ्यावर ना भीती ना अस्वस्थता, हात थरथर कापत नव्हते आणि आवाजही कुठे कापरा झालेला नव्हता. प्रत्येक हालचाल अगदी नेहमीचीच. कुठलाच गोंधळ नाही किंवा बडबड नाही. Niece slit uncle’s throat in crowded Asra Chowk Solapur Hotgi Road murder अत्यंत शांत बैठक. बोलताना उलट वाद नाही की विचारल्यानंतर वेडेवाकडे बोलणे नाही. ‘का मारलं?’ म्हणून विचारले… तर म्हणाला, ‘ तो मला मारायला आला होता; मी त्याला मारले’… ‘दुसरं कोणी होतं का?’… ‘नाही… मी एकट्यानेच मारले… दुसऱ्यांचा त्यात काय संबंध?’ अशी कबुली देतानासुध्दा तो अत्यंत शांत होता. जणू काही घडलेच नाही; अशा आविर्भावात.

ही कबुली देणारा आहे पोरगा. अवघ्या १७ वर्षांचा तरणाबांड. त्याने त्याच्या नात्याने दूरचा मामा असणाऱ्या तरुणाचा सदासर्वकाळ गजबजलेल्या आसरा चौकात गुरुवारी (ता. 6) भरदुपारी धारदार चाकूने वार करून खून केला. त्यानंतर सिव्हिल पोलीस चौकीमधील पोलिसांनी विचारल्यावर त्याने थेट कबुली देऊन शांत बसणे पसंत केले.

 

अजित मल्लिकार्जुन कोलार (वय २४, रा. कर्णिक नगर, सोलापूर) असे या घटनेत खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृत अजित आणि आरोपी हे नातेसंबंधातीलच असून मृत हा आरोपीचा दुरून मामा लागतो, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

● असा झाला खून

 

आसरा शॉपिंग सेंटरमधील एका गाळ्यात व्हिडिओ गेम सेंटरचे दुकान आहे. गुरूवारी दुपारी आरोपी हा त्या सेंटरमध्ये बसला होता. त्यावेळी मृत अजित कोल्हार त्याठिकाणी आला. पहिल्यांदा दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर शिवीगाळीमध्ये झाले. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. गच्चागच्ची झाली. त्यावेळी स्वत:ला सोडवून घेऊन आरोपी दुकानातून बाहेर पळाला. समोरच असलेल्या अंडाबुर्जीच्या गाडीवरचा कांदा कापायचा चाकू घेऊन तो परत आला.. आल्या आल्या त्याने अजितच्या गळ्यावर चाकूने वार केला. वार वर्मी लागल्यामुळे रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. क्षणार्धात तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. जेव्हा त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले; तेव्हा तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

● मृतासोबतच आरोपी गेला सिव्हिल हॉस्पिटलला

व्हिडिओ गेमच्या गाळ्यात खून झाल्याची माहिती समजताच त्याठिकाणी बघ्यांची गर्दी झाली. गर्दीतील काहींनी एक रिक्षा बोलावली. रक्तबंबाळ अवस्थेतील अजितला त्या रिक्षात घातले. त्याच्या शेजारीच आरोपीसुध्दा बसला. तेव्हाही आरोपी अत्यंत शांत होता. पुढे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अजितला दाखल केले; तेव्हाही आरोपी तिथेच थांबलेला होता. रिक्षाचालकाने आरोपीला सिव्हिल पोलीस चौकीत नेऊन बसवले. तेव्हा तेथील पोलिसांना तो आरोपी असल्याचे समजले.

● अजित होता फुल्ल नशेत

 

आरोपी आणि मृत अजित यांच्यात बुधवारी रात्री भांडण झाले होते. त्यावेळीसुध्दा प्रकरण मारामारीपर्यंत गेले होते. सोडवासोडवी झाल्यामुळे प्रकरण तिथेच थांबले होते. गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास आरोपी व्हिडिओ सेंटरमध्ये बसलेला असताना मृत अजित त्याठिकाणी गेला. त्यावेळी अजित नशेतच होता.

व्हिडिओसेंटरमध्ये पुन्हा रात्रीच्या भांडणावरून वादावादी सुरू झाली. ही वादावादी वाढत जाऊन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचले. तेव्हा आरोपीने पळत जाऊन समोरच्या अंडाबुर्जीच्या गाडीवरून कांदा कापण्याचा चाकू आणला आणि अजितवर वार केले, अशी माहिती प्रत्यक्ष घटनास्थळावरून ऐकायला मिळाली.

● दोघांच्याही खिशात सापडला गांजा

मृत आणि आरोपी दोघेही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असल्याचे समजताच विजापूर नाका पोलीस त्याठिकाणी पोहचले. तिथे पहिल्यांदा आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशात गांजाच्या पुड्या सापडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मृत अजितच्या अंगावरील पँटच्या खिशातही गांजाच्या पुड्या सापडल्याचेही सांगण्यात आले.

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #Niece #slit #uncle's #throat #crowded #AsraChowk #Solapur #HotgiRoad #murder, #सोलापूर #होटगीरोड #गजबजलेला #आसराचौक #भाचा #मामा #गळा #चिरला #खून
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लाच घेताना एक्साईजच्या निरीक्षकासह तिघे ‘एसीबी’च्या जाळ्यात
Next Article शासनाची फसवणूक : सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाच्या चौदा संचालकाचा जामीन फेटाळला

Latest News

crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद
महाराष्ट्र June 24, 2025
पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्या – खासदार मेधा कुलकर्णीं
महाराष्ट्र June 24, 2025
इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपल्याचा ट्रम्प यांचा दावा
देश - विदेश June 24, 2025
इराण- इस्रायलमधील वाढत्या तणावानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू
देश - विदेश June 24, 2025
युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
देश - विदेश June 24, 2025
शुभांशू शुक्ला उद्या घेणार अंतराळात भरारी
देश - विदेश June 24, 2025
लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ५ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्सची प्रकृती बिघडली
महाराष्ट्र June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?