Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘टाइम कॅप्सूल’बाबत एका महाराजांनी सांगितलं तर दुस-या महाराजांनी सांगितले विश्वास ठेवू नका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

‘टाइम कॅप्सूल’बाबत एका महाराजांनी सांगितलं तर दुस-या महाराजांनी सांगितले विश्वास ठेवू नका

Surajya Digital
Last updated: 2020/07/28 at 6:18 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अयोध्या : अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाकडे सध्या सर्वांच लक्ष लागलं आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान राम मंदिर उभारलं जात असताना जमिनीत दोन हजार फूट खाली ‘टाइम कॅप्सूल’ ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र हे वृत्त चुकीचं असल्याची माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

चंपत राय यांनी एएनआयशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “राम मंदिरं उभारलं जाणार आहे त्या ठिकाणी ५ ऑगस्ट रोजी जमिनीखाली टाइम कॅप्सूल ठेवण्यात येणार असल्याचं वृत्त चुकीचं आहे. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका”.

महत्त्वाचं म्हणजे याआधी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे सदस्य रामेश्वर चौपाल यांनीच टाइम कॅप्सूल ठेवलं जाणार असल्याची माहिती दिली होती. “राम मंदिराच्या बांधकामाला सुरूवात करताना जमिनीपासून २ हजार फूट खाली एक ‘टाइम कॅप्सूल’ ठेवण्यात येणार आहे. भविष्यात एखाद्याला मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असल्यास त्याला यामुळे रामजन्मभूमी बद्दलची केवळ तथ्यं सापडतील,” असं त्यांनी म्हटलं होतं.

* राम मंदिरातील रचनेत बदल

गर्भगृहापासून मंदिराच्या कळसाची उंची पूर्वी १२८ फूट इतकी होती, ती वाढवण्यात आली आहे. आता कळसाची उंची १६१ फूट इतकी असणार आहे. यात मंदिराच्या भिंती ६ फुटांच्या दगडांनी बांधण्यात येणार आहे. तर दरवाजा संगमरवरी दगडानं बनवण्यात येणार आहे. मंदिराच्या पूर्वीच्या रचनेत तीन कळस होते. मात्र सुधारित प्रस्तावात आता ५ कळस असणार आहेत. तर मंदिराला पाच प्रवेशद्वार असणार आहेत.

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

TAGGED: #टाईमकॕपसूल #विश्वास #एकमहाराज #दुसरामहाराज #राममंदिररचना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहरात 78 नवे कोरोना रूग्ण, 45 जण बरे होऊन गेले घरी; 4 मृत्यू तर 848 निगेटिव्ह अहवाल
Next Article साथीदाराच्या मदतीने मुलानेच केला जन्मदात्या वडिलाचा खून; शिराळमधील संजय काळे खून प्रकरण

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?