चेन्नई : सध्या सोशल मीडियावर एक घटना प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोला कॅप्शन देण्यात आलं आहे की, जेव्हा मुलं शाळेत जाऊन बोर होतात. सतत शाळेत जाण्याचा कंटाळा आल्यामुळे एका विद्यार्थ्यानं शिक्षिकेशी लग्न केलं आहे. जेणेकरून त्याला शाळेत न जाता घरच्याघरीसुद्धा अभ्यास करता येईल.
या व्हायरल फोटोवर लोकांनी गंमतीदार कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हा फोटो जुना असल्याचं सांगितलं जात असून सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ही घटना चेन्नईची असून २०१७ मध्ये हा प्रकार झाल्याचे सांगितलं जात आहे. एका विद्यार्थ्यांला आपल्या शिक्षिकेवर प्रेम झाल्यानं त्यानं आपल्या भावना शिक्षिकेला सांगितल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानंतर लगेचच शिक्षिकेनंही होकार दिला. त्यावेळी या विद्यार्थ्याचं वय १५ वर्ष होतं आणि शिक्षिकेचं वय २३ वर्ष होतं. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या घरच्यांनीही लग्नाला परवानगी दिली. पण त्यावेळी मुलाचं वय जास्त कमी असल्यामुळे त्यांनी फक्त साखरपुडा उरकला होता. सध्या या दोघांच्या नात्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर यांच्या साखरपुड्याचा जुना फोटो व्हायरल होत आहे.
हा फोटो पाहून एका सोशल मीडिया युजरनं मॉडर्न समस्येचं मॉडर्न सोल्यूशन अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर एका युजरनं लिहिले, ‘हा तर खूप हुशार निघाला.’ अनेकांनी चाईल्ड लाईनच्या नंबरची मागणी केली आहे. जेणेकरून या प्रकाराबाबत माहिती दिली जाईल.