नवी दिल्ली : नवी महिन्याच्या पहिल्याच दिवशी आज सामान्य माणसाला झटका देणारा बदल झाला आहे. स्वयंपाकाचा गॅस आज 25 रुपयांनी महाग झाला आहे. तर दुसरीकडे आजपासून देशात आणखी 2 मोठे बदल होणार आहेत. त्यानुसार पंजाब नॅशनल बँकेत सेव्हिंग अकाऊंट (बचत खाते) असलेल्या ग्राहकांना आता 2.9 टक्के व्याज मिळेल. ज्या व्यावसायिकांनी जीएसटीआर-3बी रिटर्न भरलेले नसेल त्यांना 1 सप्टेंबरपासून जीएसटीआर-1 फॉर्म भरता येणार नाही.
देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) ने विनाअनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ केलीय. त्याचबरोबर 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 75 रुपयांनी वाढ झालीय.
आता दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडर 884.5 रुपये झाला. तर आधी 859.50 रुपये मिळत होता. यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. दिल्लीत एलपीजीची किंमत 834.50 रुपयांवरून 859.50 रुपये करण्यात आली. 15 दिवसांत विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महाग झालेत.
दिल्लीमध्ये 14.2 किलो सिलिंडरची सबसिडीशिवाय किंमत 859.50 रुपयांवरून 884.50 रुपये झाली. कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत आता 875.50 रुपयांऐवजी 911 रुपये झाली, 900.5 रुपये मोजावे लागतील. सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किमती बदलतात. वर्ष 2021 च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 694 रुपये होती, जी आता वाढून 884.50 रुपये झाली. अशा प्रकारे एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत आतापर्यंत 9 महिन्यांत 190.50 रुपयांची वाढ झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आजपासून 2021 वर्षातील नवव्या महिन्याला सुरुवात होत आहे. आज एक सप्टेंबर आजपासून दैनंदिन जीवनाशी निगडीत आर्थिक व्यवहारांत बदल होणार आहेत. तसेच काही नवे नियमही लागू होणार आहेत. हे बदल जीएसटी रिटर्न, PF UAN शी आधार लिकिंग, राजधानी ट्रेन आणि काही बँकांच्या व्यवहारांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. तसं पाहता हे सर्व नियम सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीला, अनेक उद्योगांनी जीएसटी भरण्यास विलंब केल्यानं तब्बल 46,000 कोटी रुपयांचं थकीत व्याज वसूल करण्याच्या दिशेनं व्यक्त केली होती. व्याज एकूण दायित्वावर आकारण्यात आले होते. 19 सप्टेंबर रोजी जीएसटी दर आणि इतर मुद्द्यांवर सुधारणा करण्यासाठी परिषदेची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नुकसानभरपाई उपकर आणि नुकसान भरपाई देयक कमी करण्यावर विचार केला जाऊ शकतो.
दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेनं एक सप्टेंबरपासून आपल्या बचत खात्यांवरील व्याजदरात घट केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, वार्षिक 2.90 टक्के व्याजदर देण्यात येणार आहे. बँकेच्या सर्व नवीन आणि जुन्या खातेधारकांना हा नियम लागू असणार आहे.