Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महिलांसाठी आजपासून विशेष लोकल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

महिलांसाठी आजपासून विशेष लोकल

Surajya Digital
Last updated: 2020/09/28 at 9:38 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : पश्चिम रेल्वेने मुंबई व उपनगरांतील प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांची मोठी संख्येमुळे लोकलमध्ये गर्दी होताना दिसत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी पश्चिम रेल्वेनं एक पाऊल टाकलं आहे. आजपासून महिलांसाठी विशेष लोकल सुरु केली आहे.

मुंबईत सध्या फक्त अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल चालवल्या जात आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांच्या कामांतील वेळेतील साम्य लक्षात घेता लोकलमध्ये गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

चर्चगेट ते विरार दरम्यान अत्यावश्यक महिला विशेष लोकल सुरु करण्यात येणार आहेत. आज सोमवार, २८ सप्टेंबरपासून या लोकल फेऱ्या सुरू होतील. विरार- चर्चगेटसाठी सकाळी ७. ३५ ची लोकल रवाना होणार आहे. तर, संध्याकाळी ६.१० वाजता चर्चगेट- विरार लोकल रवाना होणार आहे.

या मार्गावर दररोज साडेतीनशे विशेष लोकल चालवल्या जात होत्या, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं त्यात वाढ केली आहे. विशेष लोकलची संख्या दीडशेने वाढवून पाचशे केली आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टनसिंग पाळले जावे व लोकलमध्ये गर्दी होऊ नये या होऊ नये या हेतूने विशेष लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक प्रवर्गातील कर्मचारी वगळता इतर प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश नसेल. त्यामुळे अन्य कोणीही रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये, अशी विनंती पुन्हा एकदा रेल्वेने केली आहे. लोकलबाबत काही अफवा पसरवल्या जात असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. प्रवाशांनी कोविड-१९ च्या अनुषंगाने अनिवार्य करण्यात आलेल्या वैद्यकीय आणि सामाजिक प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे. प्रवासादरम्यान मास्क वापरावा, असेही नमूद करण्यात आले आहे.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #महिला #विशेष #लोकल #सुरु #मास्क
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजप नेते गिरीश महाजनांच्या गाडीचा अपघात; एकजण गंभीर जखमी
Next Article पॉझिटिव्ह पे सिस्टम : पन्नास हजारांहून जादा रक्कमेच्या चेकसाठी नवीन पद्धत

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?