Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला अपघात, एक ठार तर 30 जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला अपघात, एक ठार तर 30 जखमी

Surajya Digital
Last updated: 2022/06/19 at 5:04 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

सातारा : कोल्हापूरवरून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला अपघात झाला आहे. प्रवासादरम्यान एका टेम्पोने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला तर 30 वारकरी जखमी झाले आहेत. जखमी वारकऱ्यांना साताऱ्यातील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास झाला. One killed, 30 injured in Warakaria tractor accident Satara Pandharpur Kolhapur

दोन वर्षाच्या अंतराने वारी होत असल्याने वारकऱ्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सगळ्यांनाच ज्ञानोबाच्या पालखी सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे त्यासाठी निघालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील वारकऱ्यांवर काळाने झडप घातली आहे. सातारा- पुणे महामार्गावरील शिरवळ येथे दिंडीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने जोराची धडक दिली. यात एका वारकरीचा जागीच मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत.

यातील 11 वारकरी किरकोळ जखमी झाले आहेत. मायप्पा कोंडिबा माने (वय 45) असे मृत वारकऱ्याचे नाव आहे. तर मारूती भैरवनाथ कोळी (वय 40) मृत्यूशी झुंज देत आहेत. हा अपघात आज रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झाला आहे.

पहाटे तीन वाजण्याच्या सुमाराही ही दुर्दैवी घटना घडली. कोल्हापूरचे एक रहिवासी मारुती कोळी नावाची व्यक्ती जखमी झाल्याचीही माहिती मिळतेय. इतर जखमींची नावं अद्याप कळू शकलेली नाहीत. आळंदीला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. त्यासाठी आळंदीला जायला हे वारकरी निघाले होते. मात्र वाटेतच काळानं एका वारकऱ्यांवर घाला घातलाय. तर थोडक्यात अन्य वारकरी बालंबाल बचावले आहेत. सध्या जखमी वारकऱ्यांवर उपचार केले जात आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/564568545220879/

 

 

कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले लोहोटे येथील ह.भ.प. वासकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रेश्वर भाविक मंडळाची दिंडी पंढरपूरला पायी वारीसाठी आळंदी ते पंढरपूर निघाली होती. ही दांडी शिरवळ खंडाळा गावाच्या हद्दीत पोहचताच आयशर ट्रकने पाठीमागून वारकऱ्यांच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली. यावेळी ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडल्या होत्या.

यामध्ये महिलांसह 43 वारकरी ट्रँक्टर ट्रॉलीमध्ये प्रवास करत होते. मात्र अचानक झालेल्या या अपघातामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर आयशर ट्रक पलडी झाला. यावेळी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसलेले वारकरी बाहेर फेकले गेले. तर ट्रॉलीचा पाठीमागच्या बाजूने चक्काचूर झाला आहे.

या अपघातात तीस वारकरी गंभीर तर अकरा वारकरी किरकोळ जखमी झाले आहेत. यावेळी जखमींना तातडीने युवक आणि नागरिकांच्या मदतीने शिरवळ पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील खाजगी आणि सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान अपघातातील गंभीर जखमी मारुती कोळी यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. या घटनेची नोंद घेत पोलिसात झाली असून पुढील तपास सुरु केला आहे.

 

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/564321058578961/

 

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #One #killed #30injured #Warakari #tractor #accident #Satara #Pandharpur #Kolhapur, #सातारा #पंढरपूर #कोल्हापूर #वारकरी #ट्रॅक्टर #अपघात #एकठार #30जखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Solapur Election निवडणूक महापालिकेची मात्र रंगीत तालीम विधानसभेची; तालीम विधानसभेची, लढाई वर्चस्वाची
Next Article सांगोला आणि पंढरपुरातील तीन टोळ्यातील नऊजण तडीपार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?