Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: व्यापार करार : अमेरिकेच्या दबावापुढे भारत झुकणार नाही
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

व्यापार करार : अमेरिकेच्या दबावापुढे भारत झुकणार नाही

admin
Last updated: 2025/07/07 at 4:30 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 7 जुलै (हिं.स.)।अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करारावर संपूर्ण जगाचे लक्ष आहे. अशातच भारताने आपली भूमिका स्पष्ट करत म्हंटल आहे की, आम्ही अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नाही.या व्यापार करारासाठी भारताने कृषी आणि दुग्धव्यवसाय यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर मर्यादा निश्चित केल्या आहेत. त्यामुळे, आता करार अंतिम करण्याची जबाबदारी अमेरिकेच्या हातात आहे. जर या समस्या सोडवल्या गेल्या, तर ९ जुलैपूर्वी व्यापार करार जाहीर केला जाऊ शकतो.

अमेरिकेने २ एप्रिल २०२५ रोजी भारतीय वस्तूंवर २६ टक्के अतिरिक्त प्रत्युत्तर शुल्क लादले होते, परंतु ते ९० दिवसांसाठी पुढे ढकलले. तथापि, अमेरिकेने लादलेले १० टक्के मूलभूत शुल्क अजूनही लागू आहे. जर प्रस्तावित व्यापार चर्चा अयशस्वी झाली, तर २६ टक्के शुल्क पुन्हा लागू केले जाईल. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, भारत अंतिम मुदतीच्या आधारावर कोणताही व्यापार करार करत नाही. राष्ट्रीय हिताचे असेल, तरच अमेरिकेसोबत व्यापार करार करेल. एफटीए तेव्हाच शक्य आहे, जेव्हा दोन्ही पक्षांना फायदा होईल.

शेती आणि दुग्धजन्य पदार्थ हे दोन्ही संवेदनशील विषय असल्याने अमेरिकेला शुल्क सवलती देण्याबाबत भारताने आपली भूमिका कठोर केली आहे. यापूर्वी स्वाक्षरी केलेल्या कोणत्याही व्यापार करारात भारताने कधीही दुग्ध क्षेत्र उघडलेले नाही. मात्र, ट्रम्प यांना या दोन व्यवसायांचाही या करारात समावेश करायचा आहे. यामुळेच हा करार अद्याप अंतिम होऊ शकलेला नाही. गेल्या आठवड्यात भारतीय अधिकारी अमेरिकेसोबत अंतरिम व्यापार करारावर वाटाघाटी करुन वॉशिंग्टनहून परतले. दरम्यान, भारतासह अनेक देशांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ९० दिवसांची कर सवलत दिली होती. ही सवलत येत्या ९ जुलै रोजी संपत आहे. अमेरिका आणि भारत या देशांनी फेब्रुवारीमध्ये द्विपक्षीय व्यापार करारासाठी(बीटीए) वाटाघाटी सुरू करण्याची घोषणा केली होती. बीटीए चा पहिला टप्पा पूर्ण करण्याची अंतिम मुदत सप्टेंबर-ऑक्टोबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, दोन्ही देश अंतरिम व्यापार करार अंतिम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article देव, देश, धर्म यांच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करा ! – महंत रामगिरी महाराज
Next Article उजनीतून ३७ लाख युनिट वीजनिर्मिती

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?