उमरगा : उमरगा शहरातील व्यापाऱ्यांनी लॉकडाउनला विरोध दर्शवत आज मंगळवारी (ता. ६) सकाळी साडेअकरापर्यंत दुकाने सुरू ठेवली. पोलिसांनी दुकाने बंद करण्यासाठी बाजारपेठेत गस्त घातल्यानंतर दुकाने बंद केली.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1379124532477263874?s=19
अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र गेले वर्ष भरात व्यवसायांवर संकट आले असून रोजी रोटीचा ताळमेळ घालताना नाकी नऊ येत आहे. हा निर्णय व्यापारी वर्गावर अन्याय करणारा आहे. अगोदरच वर्ष भरापासून कोरोना मुळे व्यापाऱ्यांचे अर्थ चक्र विस्कळीत झाले आहे.
वर्षभरातील बंद काळात बँकेचे हफ्ते, त्यावरील व्याज, लाईट बिल, दुकान भाडे सरकारी अनेक प्रकारचा टॅक्स, नौकर वर्गाचा पगार, हा बंद काळातला सुध्दा द्यावा लागला आहे. बँका कर्ज वसुलीसाठी नोटिसा पाठवत आहे. महावितरण लाईट कट करत आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग हा अगोदरच रसातळाला गेला आहे. त्यात हा लॉकडाऊन जीवघेणा ठरत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी ६ एप्रिल पासून जाहीर केलेला हा अंशतः लॉकडाऊन व्यापाऱ्यांच्या मुळावर असून तात्काळ मागे घेण्यात यावा, किंवा सर्व आस्थापने आठ ते दहा दिवस बंद करावेत, नसेल तर सर्व आस्थापना सुरू ठेवावेत. अशी मागणी व्यापाऱ्यांनी ज्ञानराज चौगुले व उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांना निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार, उपाध्यक्ष प्रदिप चालुक्य, सचिव शिवप्रसाद लड्डा, कार्याध्यक्ष नितीन होळे यांच्यासह कापड, सराफ, हार्डवेअर पेंट, भांडी, ॲटोमोबाईल्स, इलेक्ट्रॉनिक्स व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोना सेंटरमध्ये बाधित रुग्णाची आत्महत्या https://t.co/rHp5hkktSK
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 6, 2021
दरम्यान एकीकडे व्यापारी दुकाने उघडी ठेवून लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे बाजू मांडत होती तर दुसरीकडे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, उपनिरीक्षक अमोल मालुसुरे यांच्यासह कर्मचारी व पालिका यंत्रणेचे कर्मचाऱ्यांनी दुकाने बंद केली. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. अत्यावश्यक सेवेतील दुकाने मात्र सुरु होती.